साताऱ्या मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या ८३ जणांवर कारवाई

साताऱ्या मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या ८३ जणांवर कारवाई

मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्यांना काढायला लागल्या उठाबशा

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये, याकरता देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. मात्र, लॉकडाऊन असताना देखील साताऱ्यात मोठ्या संख्येने नागरिक मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडत आहेत. अशा नागरिकांची धरपकड करुन ८३ जणांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. सोमवारी कराड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत विविध ठिकाणी पोलिसांनी कारवाई केली आहे. सोशल डिस्टन्सिंग ठेवत सर्वांना न्यायालयात हजर केले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

देशात लॉकडाऊन सुरु असल्याने कोणीही घराबाहेर पडू नये, अशा वारंवार सूचना देऊन देखील काही व्यक्ती मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडतात. केवळ अत्यावश्यक सेवा सुरु असून इतर कोणालाही रस्त्यावर फिरु दिले जात नाही. मात्र, असे असताना देखील नियम धाब्यावर ठेवत नागरिक घराबाहेर पडत असतात, त्यामुळे आज वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कराड शहर पोलिसांनी मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्यांवर धडक कारावाई केली आहे. दरम्यान, सोशल डिस्टन्सिंगच ठेवत सर्वांना शहर पोलिसांनी न्यायालयात नेले आहे.


हेही वाचा – दिवे लावण्याऐवजी अतिशहाणपणा केला आणि चांगलाच नडला


 

First Published on: April 6, 2020 3:41 PM
Exit mobile version