शेतकऱ्यांचे खावटी कर्ज होणार माफ!

शेतकऱ्यांचे खावटी कर्ज होणार माफ!

प्रातिनिधिक फोटो

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत खावटी कर्ज माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत आतापर्यंत ४० लाख ७७ हजार खातेधारकांच्या बँक खात्यात १७ हजार कोटी रक्कम जमा करण्यात आली आहे. राज्यातील शेतकऱ्यांनी ज्या बँकेतून खावटीसाठी कर्ज काढली आहेत, त्या शेतकऱ्यांचा समावेश छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत करुन हे कर्ज माफ करण्यात यावे, असा निर्णय उपसमितीने घेतला आहे. मंत्रालयात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या उपसमितीची आढावा बैठक झाली. या बैठकीस महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, परिवहन मंत्री दिवाकर रावते, सहकार मंत्री सुभाष देशमुख, सहकार विभागाचे प्रधान सचिव आभा शुक्ला व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

राज्यातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना-२०१७ जाहिर केली होती. या योजनेत खावटी कर्जाचा समावेश नव्हता. अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांची खावटी कर्ज माफ करावी, अशी मागणी होती. याचा अभ्यास करुन ज्या बँकेतून शेतकऱ्यांनी खावटीसाठी कर्ज घेतले आहेत त्या शेतकऱ्यांचा छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना-२०१७ मध्ये समावेश करुन हे कर्ज माफ करण्यात यावे, असा निर्णय उपसमितीने घेतला.


वाचा: मुंबईतील पाणी टंचाई निवारणासाठी महत्वाचा निर्णय
वाचा: भाजपाचा पराभव राष्ट्रवादी करणार – अजित पवार

First Published on: December 11, 2018 8:58 PM
Exit mobile version