क्रांती शुगर कारखाना कवडीमोल भावात विकला, किरीट सोमय्यांचा आरोप

क्रांती शुगर कारखाना कवडीमोल भावात विकला, किरीट सोमय्यांचा आरोप

भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्यांनी पारनेरमधील क्रांती शुगर कारखान्याची पाहणी केली. पारनेरमधील शेतकरी, कामगार आणि कारखाना बचाव समितीने काही मुद्दे मांडले असून त्यावर कारवाई करणार असल्याचे किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे. क्रांती शुगर कारखाना कवडीमोल भावात विकला असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे. तसेच साखर कारखाना म्हणजे पवार असेही सोमय्या यांनी म्हटलं आहे. क्रांती शुगर कारखाना कसा बंद पडला? तो कोणाला चालवण्यासाठी दिला गेला? त्याच्याकडे पैसे कुठून आले असे अनेक प्रश्न किरीट सोमय्या यांनी उपस्थित केले आहेत. तसेच लवकरच आपण कोल्हापूरला जाणार असल्याचे सोमय्या यांनी म्हटलं आहे.

भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे की, हायकोर्टात देखील त्या कंपनीचे नाव होते. आम्ही आग्रह करुन काही माहिती दिली. तसेच क्रांती शुगर काय आहे. आधी कारखाना सुरु होता नंतर बंद पडला. त्याच्या खात्यात पैसे कुठून आले. ज्या वर्षी त्या व्यक्तीला कारखाना देण्यात आला त्याच्या आधी त्या व्यक्तीची बॅलेन्सशीट काय होती. त्यांचे स्वतःचे इन्कम टॅक्सची क्षमता काय? त्याच्याकडे अनुभव होता का? हे तपासले आहे का? याबाबत मला शंका असल्याचे सोमय्यांनी म्हटलं आहे.

कारखान्यात मागच्या दारानं पैसे आले

क्रांती शुगरमध्ये देखील मागच्या दरवाजाने पैसे आले आहेत. कुठून २३ कोटी, कुठे ३० कोटी रुपये आले याचा तपास व्हायला पाहिजे. राज्य सहकारी बँकेनी आणि आणखी काही बँकांनी सांगितले अजून पैसे भरायला सांगितले आहे. असे म्हटलं जात आहे परंतु पाहावं लागणार आहे, नोटीस दिल्यानंतर मालक पैसे भरतो तर ते पैसे आले कुठून आणि नंतर तीच बँक त्याला लोन देतो हे काय चाललय? म्हणून याचा तपास झाला पाहिजे. याचा तपास ईडीने सुरु केला आहे.

म्हणून दोन गोष्टी वेगळ्या आहेत. घोटाळा आणि साखर कारखाना चालवणे, शेतकऱ्यांचे रक्षण करणे, ऊसाची व्यवस्था होणे, कारखाना चालू राहणे आणि कामागारांच्या हिताचे रक्षण, जर कोणी गल्लत उभी करत असेल की, मी गेलो माझा घोटाळा सिद्ध झाला म्हणून शेतकरी उपाशी राहणार अशा धमक्यांना किरीट सोमय्या घाबरत नाही. हायकोर्टाने आदेश दिला आहे. तुम्हाला चॅलेंज करायचा असेल तर हायकोर्टात जाऊन चॅलेंज करा.

शेतकऱ्यांना मोबदला देणार का?

पारनेर साखर कारखाना मालकाला कसं काय दिला, आजारी कसा पडला, आजारी पडल्यानंतर काय झाले. त्याच्या ४०० एकर जमिनीचे काय झाले शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा मोबदला देता येणार का? अशा अनेक मुद्द्यांवर चर्चा केली असून शेतकरी कामगारांनी हे मुद्दे मांडले असल्याची माहिती किरीट सोमय्या यांनी दिली आहे.


हेही वाचा :  ठाकरे सरकार घोटाळेबाज मुश्रीफांना पुन्हा वाचवणार का ? कोल्हापूर दौऱ्यावरुन सोमय्यांचे आव्हान


 

First Published on: September 23, 2021 3:22 PM
Exit mobile version