आयकर विभागाच्या कारवाईशी माझा संबंध नाही, सोमय्यांच्या दाव्याला भुजबळांचे उत्तर

आयकर विभागाच्या कारवाईशी माझा संबंध नाही, सोमय्यांच्या दाव्याला भुजबळांचे उत्तर

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची १०० कोटींची बेहिशेबी मालमत्ता आयकर विभागाने जप्त केल्याचा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. त्यासंबंधीत परिपत्रक आयकर विभागाने जाहीर केल्याचेही त्यांनी म्हटले आहे. मात्र आयकर विभागाच्या कारवाईशी माझा संबंध नाही, असे म्हणत सोमय्यांच्या दाव्याला भुजबळांनी उत्तर दिले आहे.

किरीट सोमय्यांनी आज सकाळी ७ वाजता मंत्री छगन भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार पंकज भुजबळ यांची १०० कोटींची बेनामी मालमत्ता आकर विभागाने जप्त केल्याचा दावा केला. त्यानंतर मंत्री छगन भुजबळ यांनी वृत्तवाहिन्यांशी बोलताना, हे प्रकरण २०१७ चं आहे. न्य़ायप्रविष्ठ असणाऱ्या या  प्रकरणाची अद्याप चौकशी सुरु आहे. मात्र नवीन असे कुठलेही प्रकरण नाही. असे भुजबळांनी स्पष्ट केले.

यावर बोलनाता भुजबळ पुढे म्हणाले की, ”त्या प्रकरणाचा संबंध लावत ते म्हणताय की कुठली १०० कोटींची इमारत त्याबद्दल आजच्या वर्तमानपत्रांंमध्ये त्या इमारत मालकाने लिहिले की, या इमारतीशी भुजबळांचा कोणताही संबंध नाही. ही त्यांच्या कंपनीची मालमत्ता आहे. त्याचा काही प्रश्न नाही. बाकी ज्या केसेस आहेत त्या जुन्य़ा आपल्या चालू आहेत.”

‘केंद्रीय तपास यंत्रणांकडून केल्या जाणाऱ्या कारवाया राजकारणापोटी’

“नारायण राणेंवर महाराष्ट्र पोलिसांनी कारवाई केली तर ती द्वेषापोटी केली, किंवा सरकारने सांगितले म्हणून केले. मात्र केंद्रीय तपास यंत्रणांकडून इतरांवर केल्या जाणाऱ्या कारवाया कशा पोटी करतायत? तेपण राजकारणापोटीच करतायतं ना. दुसरं काय़ करतायत?” असा आरोपही भुजबळांनी केला.


भुजबळांची १०० कोटींची बेहिशेबी मालमत्ता आयकर विभागाकडून जप्त, सोमय्यांचा दावा


First Published on: August 25, 2021 10:58 AM
Exit mobile version