८५ व्या वर्षी लाठी-काठीचे खेळ करून पोट भरणाऱ्या ‘या’ आजी आहेत तरी कोण?

८५ व्या वर्षी लाठी-काठीचे खेळ करून पोट भरणाऱ्या ‘या’ आजी आहेत तरी कोण?

आजीच्या टॅयलेंटचं पुण्याच्या आयुक्तांनी केलं कौतुक

गेले दोन दिवस सोशल मीडियावर लाठ्या- काठ्या खेळणाऱ्या आजींचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओची दखल अभिनेता रितेश देशमुख आणि पुण्याच्या आयुक्तांनीही घेतली. पण तुम्हाला माहितेय का त्या आजी कोण आहेत ते. या आजींच नाव आहे शांताबाई पवार. त्या ८५ वर्षांच्या आहेत. या कोरोना काळात आपलं आणि नातंवंडांच पोट भरण्यासाठी या आजीला लाठ्या- काठ्यांचा खेळ रस्त्यावर खेळावा लागत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या आजींच्या या व्हिडिओला लाखो लाईक्स मिळाले आहेत.

या ८५ वर्षीय आजी लाठी- काठीचा खेळ दाखवून पोट भरण्याची वेळ आली आहे. भर पावसात, उन्हात न थांबता पैशासाठी या आजींना हा खेळ खेळावा लागत आहे. या आजी हडपसरमध्ये वैदवाडी गोसावी वस्ती येथे राहतात, त्यांची चार मुलं व सुना यांचा मृत्यू झाल्याने त्यांच्यावर १७ नातवाची जवाबदारी आली. त्यातील तीन नातवंडांचे त्यांनी काबाड कष्ट करून लग्नही केलं. आता सध्या त्या १४ नातवांचा सांभाळ करत आहेत.

पण मागील तीन महिन्या पासून कोरोनाचे संकट आलं आहे त्यामुळे देशात लॉकडाऊन सुरू आहे. लॉकडाऊनमुळे हातावरचे पोट असलेल्या या कुटुंबाची उपासमारी सुरू झाली. अनेक दिवस पाच मुलीसह आजी उपाशी झोपल्या, मात्र त्यांच्याकडे कोणाचे लक्ष गेले नाही. शेवटी लॉकडाऊन उठल्यानंतर आजीने रस्त्यावर उतरून काठी फिरवण्याची कला सादर करण्यास सुरुवात केली.

गेले दोन दिवस सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले. या व्हिडीओत आजी काठी फिरवण्याच्या कलेबरोबरच नागरिकांना मदत करण्याचं आवाहन करत आहेत. त्या म्हणतात अनेक पुरस्कार मिळाले आहेत, बालगंधर्व येथे माझ्या कलेचे कौतुक केले होते, मात्र या पुरस्कारकडे पाहून माझ्या कुटुंबाचे पोट भरेल असे मला वाटत नाही. कृपया मला मदत करा, माझ्या नातीना शिकवून मोठे करायचे आहे, असे शांताबाईंनी सांगितलं. माझी कला आवडली असेल तर मला मदत करा, असं त्या नागरिकांना हात जोडून विनंती करत आहेत.

अनेक चित्रपटात केली आहेत कामं

तरूणपणी अनेक चित्रपटांमध्ये धडकलेल्या शांताबाईंनी सीता और गीता, त्रिशूल व शेरणी या प्रसिध्द चित्रपटांमध्ये काम केलं आहे. मात्र लग्नानंतर त्यांनी हा डोंबारणीचा खेळ बंद केला. पण नवऱ्याच्या अकस्मात निधनामुळे शांताबाईंना आपल्या ४ मुलांसाठी हा खेळ पुन्हा सुरू करावा लागला.


हे ही वाचा – आजीच्या टॅलेंटचं पुण्याच्या आयुक्तांनी केलं कौतुक…


 

First Published on: July 24, 2020 1:45 PM
Exit mobile version