आज २२ मार्च: जाणून घ्या राज्यातील करोना बाधित रुग्णांची जिल्हावार आकडेवारी

आज २२ मार्च: जाणून घ्या राज्यातील करोना बाधित रुग्णांची जिल्हावार आकडेवारी

छायाचित्र साभार - (Mashable India)

आज राज्यात १० नवीन करोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी पुणे येथील ४, मुंबईचे ५ तर नवी मुंबई येथील १ रुग्ण आहे. या मुळे राज्यातील बाधित रुग्णांची संख्या ७४ झाली आहे. एच एन रिलायन्स रुग्णालयात भरती झालेल्या करोना बाधित ६३ वर्षीय पुरुषाचा आज मृत्यू झाला. करोनामुळे झालेला हा राज्यातील दुसरा मृत्यू आहे. दोन दिवसांपूर्वी पुण्यातील भारती विद्यापीठ रुग्णालयात कोणताही परदेशी प्रवासाचा इतिहास नसलेली जी ४१ वर्षीय महिला करोना बाधित आढळली तिचे चार जवळचे नातेवाईक आज करोना बाधित आढळून आले.

गुजरात प्रवासाचा इतिहास असलेल्या ज्या ६३ वर्षीय प्रवाशाचा आज एच. एन. रिलायन्स रुग्णालयात मृत्यू झाला त्यांची पत्नीही आज करोना बाधित आढळली आहे. ती देखील एच. एन. रिलायन्स रुग्णालयात भरती आहे. याशिवाय कस्तुरबा रुग्णालयात भरती असलेले ५ रुग्ण करोना बाधित आढळले आहेत. यातील २ रुग्णांनी अमेरिकेचा तर प्रत्येकी एकाने स्कॉटलंड, तुर्कस्थान आणि सौदी अरेबिया येथे प्रवास केलेला आहे. या ५ रुग्णांपैकी १ रुग्ण ऐरोली , नवी मुंबई येथील आहे.

राज्यातील जिल्हा आणि मनपा निहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे –

मुंबई                                                 २४

पुणे मनपा                                           १५

पिंपरी चिंचवड मनपा                                १२

नागपूर, यवतमाळ, कल्याण (प्रत्येकी)              ४

नवी मुबंई                                             ४

अहमदनगर                                           २

पनवेल, ठाणे, उल्हासनगर (प्रत्येकी)              १

औरंगाबाद, रत्नागिरी (प्रत्येकी)                      १

एकूण –                                             ७४

राज्यात आज एकूण २८४ परदेशातून आलेले प्रवासी सर्वेक्षणाखाली दाखल झाले आहेत. राज्यात सध्या ७४५२ लोक घरगुती विलगीकरणात ( होम क्वारंटाईन) आहेत. १८ जानेवारी पासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आज पर्यंत १८७६ जणांना भरती करण्यात आले आहे. आज पर्यंत भरती करण्यात आलेल्यापैकी १५९२ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ७४ जण पॉझिटिव्ह आले आहेत.

नवीन करोना विषाणू आजार प्रतिबंध व नियंत्रण पूर्वतयारी म्हणून राज्यात सर्व जिल्हा रुग्णालये तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विलगीकरण स्थापन करण्यात आले आहेत. केंद्र सरकारच्या सूचनेनुसार सर्व देशातील प्रवाशांची तपासणी विमानतळावर करण्यात येऊन त्यातील लक्षणे असणा-या प्रवाशांना विलगीकरण कक्षात भरती करण्यात येत आहे . याशिवाय भारत सरकारच्या सूचनेनुसार अतिजोखमीच्या देशातून येण-या प्रवाशांना संस्थात्मक पातळीवर क्वारंटाईन करण्यात येत असून आज पर्यंत ७९१ जणांना विविध क्वारंटाईन संस्थांमध्ये ठेवण्यात आले असून आजपर्यंत त्यापैकी २७३ जणांना घरगुती क्वारंटाईन करता सोडण्यात आले आहे तर सध्या ५१८ प्रवासी क्वारंटाईन संस्थामध्ये आहेत.

First Published on: March 22, 2020 8:16 PM
Exit mobile version