कोल्हापूरच्या अंबाबाईचे दर्शन सर्वांना रांगेतूनच; ‘पेड दर्शन’ला न्यायालयाची मनाई

कोल्हापूरच्या अंबाबाईचे दर्शन सर्वांना रांगेतूनच; ‘पेड दर्शन’ला न्यायालयाची मनाई

कोल्हापूरच्या अंबाबाईचे दर्शन सर्वांना रांगेत उभे राहुनच घ्यावे लागणार आहे. कारण अंबाबाई मंदिरातील पेड ई पासला कोल्हापूर दिवाणी न्यायालयाने आज परवानगी नाकारली. त्यामुळे कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात 200 रुपयात तासाला 1 हजार भाविकांना दर्शन देण्याच्या पेड दर्शन योजनेला ब्रेक लागला आहे. (kolhapur ambabai temple paid darshan denied permission to district collector by civil court)

मुख्य दर्शन मार्ग सोडून व्हीआयपी दर्शन आणि ई पेड पास सुविधा देता येणार नसल्याचे न्यायालयानेआपल्या आदेशात स्पष्ट केले आहे. सह दिवाणी न्यायाधीश सिंघेल यांनी हे आदेश दिले आहेत. याशिवाय, न्यायालयाने ई पास परवानगी नाकारताना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनाही कानपिचक्या दिल्या आहेत.

जिल्हाधिकारी राहुल रेखावार पेड दर्शन योजना राबवण्यावर ठाम होते. मात्र या योजनेला न्यायालयाने नकार दिला आहे. दिवाणी न्यायालयाने पेड ई पास देण्यास मनाई केली आहे.

श्रीपूजक गजानन मुनिश्वर यांची याचिका न्यायालयातर्फे मंजूर करण्यात आली आहे. मुनीश्वर यांनी ई पास निर्णयाला विरोध करत याचिका दाखल केली होती. मुनीश्वर यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती, जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या विरोधात याचिका दाखल केली होती.


हेही वाचा – उदे गं अंबे उदे! नवरात्रीनिमित्त घ्या मुंबईतील ‘या’ प्रसिद्ध देवींचे दर्शन

First Published on: September 26, 2022 10:42 PM
Exit mobile version