Kolhapur Crime : कोल्हापुरात 23 वर्षीय तरुणावर गोळीबारासह धारदार शस्त्राने वार; 5 संशयितांची नावे समोर

Kolhapur Crime : कोल्हापुरात 23 वर्षीय तरुणावर गोळीबारासह धारदार शस्त्राने वार; 5 संशयितांची नावे समोर

कोल्हापूर : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील गोळीबाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. पुण्यानंतर आता कोल्हापुरात गोळीबार झाल्याची बातमी समोर आली आहे. कोल्हापुरातील जवाहरनगर परिसरात गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. जवाहर नगरातील यादव कॉलनीमधील सरनाईक वसाहतीमध्ये रविवारी रात्री 11 वाजता सुमारास गोळीबार झाला. या गोळीबारात साद शौकत मुजावर (23) गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. (Kolhapur Crime News jawahar nagar firing 23 years old youth injured)

मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापुरातील जवाहर नगरातील यादव कॉलनीमधील सरनाईक वसाहतीमध्ये गोळीबार झाला. गोळीबारापूर्वी साद मुजावर हा त्याच्या मित्रांसोबत घराजवळील कट्ट्यावर बसला होता. त्यावेळी दुचाकी आणि कारमधून आलेल्या पाच ते सहा जणांनी साद मुजावर हल्ला केला. सुरूवातील त्याच्या दिशेने गोळ्या झाडल्या. त्यातील एक गोळी साद मुजावरच्या मांडीत घुसली तर, दोन गोळ्या हवेत झाडल्या. त्यानंतर हल्लेखोरांपैकी दोघांनी त्याच्या डोक्यावर धारदार शास्त्राने हल्ला केला.

हेही वाचा – Crime News : गुंतवणुकीच्या नावाने व्यावसायिकाने घातला 1.64 कोटींचा गंडा

अचानक हल्ला साद मुजावर यांच्यावर हल्ला झाल्याने त्याच्या मित्रांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, त्याचवेळी गोळीबार झालेल्या परिसरात लोक येत असल्याचे पाहिल्यानंतर हल्लेखोरांनी पळ काढला. त्यानंतर साद याला त्याच्या मित्रांनी दुचाकीवरून सीपीआरमध्ये दाखल केले. रात्री उशिरापर्यंत त्याच्यावर उपचार सुरू होते.

या घटनेची माहिती मिळताच राजारामपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अधिक तपास केला. त्यावेळी दोन पुंगळ्या हस्तगत केल्या गेल्या. तसेच, याप्रकरणी पोलिसांनी तपास केला असता, साद मुजावरने पोलिसांना पाच संशयितांची नावे सांगितली. सद्दाम मुल्ला, इमाम हुसेन कुरणे, माजी नगरसेवक सत्तार मुल्ला, मोहसीन मुल्ला, तौहिक कुरणे अशी त्यांची नावे आहेत. दरम्यान, अचानक घडलेल्या या घटनेमुळे या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.


हेही वाचा – Beed : पार्किंगवरून बीडमधील वैद्यकीय महाविद्यालयात दोन गटांत हाणामारी; 16 जणांवर गुन्हा दाखल

Edited By – Vaibhav Patil

First Published on: April 22, 2024 10:53 AM
Exit mobile version