Gunratna Sadavarte : गुणरत्न सदावर्तेंना पुन्हा पोलीस कोठडी, कोल्हापूर जिल्हा कोर्टाचा निर्णय

Gunratna Sadavarte : गुणरत्न सदावर्तेंना पुन्हा पोलीस कोठडी, कोल्हापूर जिल्हा कोर्टाचा निर्णय

संग्रहित छायाचित्र

एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना सातारा पोलिसानंतर मुंबई पोलिसांनी कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे. मराठा आरक्षण आणि मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्या प्रकरणी सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल करण्यता आला आहे. कोल्हापुरातील शाहुपुरी पोलीस स्टेशनमध्ये सदावर्तेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदावर्ते यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. परंतु कोल्हापूर पोलिसांनी चौकशी करण्यासाठी पोलीस कोठडीची मागणी केली होती. पोलीसांनी काही पुराव्यांच्या आधारे तपास सुरु केला आहे. अनेक गोष्टी पोलिसांनी रिमांड रिपोर्टमध्ये नमूद केल्या होत्या तसेच सदावर्तेंनी स्वतः कबुल केलंय की, काही गोष्टी आंदोलनादरम्यान रेकॉर्ड झाल्या आहेत. कोर्टाने त्यांना ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सदावर्ते पोलिसांच्या ताब्यात आहेत. त्यांना कधी पोलीस कोठडी तर कधी न्यायालयीन कोठडी देण्यात येत आहे. मुंबईत एसटी कर्मचाऱ्यांना चिथावणी दिल्यामुळे अटक कऱण्यात आले होते. दोन वर्षांपूर्वी कोल्हापूर आणि साताऱ्यातील छत्रपतींच्या घराण्यातील व्यक्तिंविरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे सातारा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते. सातारा पोलिसांच्या चौकशीनंतर आता सदावर्ते मुंबई पोलीस आणि त्यानंतर कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात आहेत. कोल्हापूरमध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य सदावर्ते यांनी केले होते. याच्या काही व्हिडीओ क्लीप्स समाजमाध्यमांवर आहेत. या प्रकरणी सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याचा तपास कोल्हापूर पोलीस करत आहेत.

काय आहे प्रकरण?

मराठा आरक्षणासंदर्भात ५ मे २०२१ रोजी सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर गुणरत्न सदावर्ते यांनी वादग्रस्त विधान केले होते. या प्रकरणी सकल मराठा समाजाचे दिलीप मधुकर पाटील यांनी तक्रार केली होती. यानुसार कोल्हापूरच्या शाहुपुरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदावर्तेंची चौकशी करण्यासाठी पोलीस कोठडी देण्याची मागणी कोल्हापूर कोर्टात करण्यात आली होती. यावर सुनावणी झाली असून कोर्टाने सदावर्तेंना ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

सदावर्तेंचा कोर्टात युक्तिवाद

गुणरत्न सदावर्ते यांनी कोर्टात युक्तिवाद केला आहे. यावेळी ते म्हणाले की, माझ्याविरोधात आता तक्रारी दाखल करण्यात येत आहेत. हा मुहूर्त कशातून शोधला आहे? माध्यमांनी प्रश्न केल्यानंतर मी उत्तर दिले होते. उपलब्ध असलेल्या व्हिडिओनुसार तपास करता येऊ शकतो असेही त्यांनी म्हटले. मी केलेल्या वक्तव्यामुळे दंगल होईल असे कारण देण्यात आले. मात्र, अद्याप दंगल झाली नसल्याचेही सदावर्ते यांनी म्हटले.


हेही वाचा : भाजप आमदार गणेश नाईकांना न्यायालयाचा दणका, अटकपूर्व जमीन अर्ज फेटाळला

First Published on: April 21, 2022 4:17 PM
Exit mobile version