वानखेडेंविरोधात आरोप कोर्टात करा, ट्विटरवर का करता? क्रांती रेडकरचे मलिकांना प्रतिउत्तर

वानखेडेंविरोधात आरोप कोर्टात करा, ट्विटरवर का करता? क्रांती रेडकरचे मलिकांना प्रतिउत्तर

वानखेडेंविरोधात आरोप कोर्टात करा ट्वविट का करता? क्रांती रेडकरने मलिकांना प्रतिउत्तर

आर्यन खान प्रकरणामुळे एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे आता वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. वानखेडेंविरोधात आर्यन ड्रग्ज प्रकरणातील साक्षीदार प्रभाकर साईलने वसूलीचे आरोप केले आहेत. त्यामुळे वानखेडेंना चौकशीसाठी दिल्लीच्या एनसीबी मुख्यालयात बोलवण्यात आले आहे. यातच नवाब मलिकांनीही आज पत्रकार परिषद घेत वानखेडेंवर वसुलीचे आरोप करत त्यांचे जातीय प्रमाणपत्र बनावट असल्याचे आरोप केले आहेत. या आरोपांनंतर आता वानखेडे यांची पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच नवाब मलिकांचे आरोप बिनबुडाचे असल्याची टीका केली आहे. वानखेडेंविरोधात आरोप कोर्टात करा ट्वविटवर का करता? अशा शब्दात क्रांती रेडकरने मलिकांना प्रतिउत्तर दिले आहे.

यावेळी बोलताना क्रांती रेडकर म्हणाली की, नवाब मलिकांना उत्तर वेळंच देईल. अजून वानखेडेंविरोधात कटकारस्थान रचली जातील त्यांना वेगवेगळ्या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न केला जाईल, परंतु या सर्व गोष्टी सिद्ध करणं मोठी गोष्ट असते. पण ते सर्व सिद्ध होणं कठीण आहे कारण सर्व आरोप खोटे आहेत.

अशी पत्रं कोणीही लिहू शकतं, ज्या पत्रावर कोणाचेही नाव नाही, त्यावर कोणाचा दावा नाही… ज्याने हे पत्र लिहिले आहे त्याने समोर येत बेधडकपणे तक्रार करा. यानंतर याची तपासणी करा….खोटी पत्र जर कोणी लिहित असेल तर त्याला काहीचं अर्थ नाही. सर्व पुरावे खोटे आहेत. आरोपांसोबत कोर्टात पुरावे सादर करा. ट्वीटरबाजी करुन काही साध्य होणार नाही कारण ट्वीटरवर कोणीही उठून काहीही लिहू शकतो. मी देखील उद्या उठून काहीही लिहेन पण ते खरं कसा म्हणून शकाल. त्यामुळे आरोपींवर काहीच ठोस पुरावे नाहीत. असं क्रांती म्हणाली.

“वानखेडेंच्या सर्व गावाचे जातीय प्रमाणपत्र तपासा”

“समीर वानखेडेंच्या पूर्ण गावाचे जातीय प्र्माणपत्र तुम्ही तपासा, वानखेडे कुटुंबियांचे प्रमाणपत्र तपासा. त्यांच्या वडीलांनाही काल जातीय प्रमाणपत्राचे पुरावे दाखवले आहेत. त्यामुळे एक व्यक्ती बनावट जातीय प्रमाणपत्र बनू शकतो पूर्ण गावं थोडी बनावट प्रमाणपत्र बनवेल. त्यामुळे त्यांचा शोध थोडा कमी पडलाय त्यांनी अजून माहिती घेऊन यावी. त्यांच्या फॅनटास्टीक रिसर्च टीमने अजून शोध घ्यावा. आम्ही सतत पुरावे दाखवले. पुरावे सादर केले. माझी आज शेवटी पत्रकार परिषद असेल उद्यापासून मी मीडियासमोर देखील येणार नाही. सतत त्याच त्याच गोष्टी सांगून वैताग आला आहे. माझा पती खोटा किंवा आरोपी नसताही मला रोज एक एक स्पष्टीकरण देत बसायचं? आम्ही सहन करु शकत नाही.” असंही क्रांती रेडकर म्हणाली.

“याप्रकरणातून समीर वानखेडे लवकरंच बाहेर पडतील,. कारण हे आरोप कोर्टासमोर करण्यात आलेचं नाहीत. ट्वीटवर केलेले आरोप आहेत.. ट्विटर कोर्ट आहे का? तर नाही. कोर्टात आरोप सिद्ध झाले तर तुम्ही गुन्हेगार ठरवा. मीडिया ट्रायल घेऊन एखाद्या व्यक्तीला तुम्ही कसे गुन्हेगार मानू शकता? आरोप करणाऱ्य़ांनी कोर्टात जावे. आमच्याकडे कोर्टात जाण्याइतके पैसे नाहीत. कोट्यावधीची संपत्ती नाही. आम्ही खूप साधी लोकं आहोत. कोर्टात जाण्यासाठी देखील आपल्याकडे पैसे लागतात. पण आमच्या नाकावरून पाणी गेलं तर आम्ही नक्की जाऊ. परंतु जनतेच्या पाठिंब्यापर्यंत लढत राहू. परंतु आव्हान देत लढता येत नाही. त्यांच्याकडे पैसे असतील तेवढे आमच्याकडे नाहीत.”

“नवाब मलिकांना शुभेच्छा देते. त्याचं कुटुंब सुखी-समाधानी राहावं.. समीर वानखेडे प्रमाणिक अधिकारी आहेत. त्यांच्या कार्यपद्धतीमुळे अनेकांना त्रास होतोय. त्यामुळे काहींना त्यांचे स्वार्थ साध्य करता येत नाही. काहींची इच्छा आहे त्यांना पदावरून हटवले जावे. म्हणून अशाप्रकारे काम सुरु आहे. मात्र ते निश्चित यासर्व गोष्टीतून बाहेर पडतील. कारण सत्याचा विजय होतो.”

“समीर केवळ कलाकारांना पकडत नाही. शंभर टक्क्यातून तीन टक्के लोक कलाकार असतील. ते डॉन किंवा ड्रग्ज पेडलर यांना पकडत असतात. त्यामुळे ते पर्सनल राग काढत आहेत असं म्हणणं चुकीचं ठरेल. ते केंद्र सरकारच्या एजन्सीसोबत काम करत आहेत. मात्र, ते कोणत्याही पक्षाशी संबंधित नाहीत,” असंही तिने सांगितलं.

यासोबतच ती पुढे म्हणाली, “मला मराठी असल्याचा अभिमान आहे. मला देशभरातून समर्थनाचे मेसेज येत आहे. महाराष्ट्रातूनही अनेकांनी मला मेसेज केले आहेत. पण मला आणि माझ्या परिवाराला आपल्याच राज्यात कोणीतरी त्रास देत आहे, हे वाईट आहे. मला माझ्या राज्यात सुरक्षित वाटायला हवं ना? मला अनेकांनी शिव्या दिल्या आहेत, तुम्हाला जाळून टाकेन, मारून टाकेन अशा धमक्याही येत आहेत”.


 

 

First Published on: October 26, 2021 2:05 PM
Exit mobile version