भंडाऱ्यात घरगुती वादातून मुलांसह मातेचे विष प्राशन

भंडाऱ्यात घरगुती वादातून मुलांसह मातेचे विष प्राशन

विष प्राशन करून आत्महत्या

भंडारा जिल्ह्यात घरगुती वादातून दोन मुलांसह मातेने विष प्राशन केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. त्यात एका मुलाचा मृत्यु झाला असून माता आणि दुसरा मुलगा गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे. विषारी औषध प्राशन केल्याने मृत्य पावलेल्या हर्षद पारडकर (वय ४) आणि गंभीर असलेल्या मातेचे नाव दीप्ती पारडकर (वय २६), मुलगा पलाश (वय ६) यांचा समावेश आहे. हर्षद हा उपचारादरम्यान मृत पावल्याने घटनेला पेव फुटले. घटनेमुळे एकच हळबळ माजली आहे.

उंदीर मारण्याचे विषारी औषध प्राशन

तुमसर शहराच्या नेहरु नगरात मंगेश पारडकर (वय ३२) याचे कुटुंब वास्तव्यास आहे. मिळालेल्या माहितीनुसार घटनेच्या दिवशी पत्नी दिप्ती आणि मंगेश यांच्यामध्ये घरघुती वाद घडून आला. कौटुंबिक कलह एका टोकाला पोहोचला. त्यात रागाच्या भरात दिप्तीने उंदीर मारण्याचे विषारी औषध आणले. दोन्ही चिमुकल्यांसह तिने ते विषारी औषध प्राशन केले. मातेसह मुलांची प्रकृती गंभीर होतांना दिसताच पती मंगेश व शेजारच्यांनी त्यांना तुमसर येथील उपजिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल केले. एक दिवसाच्या उरचारादरम्यान तिघांना भंडारा येथे हलविण्यात आले. त्यात चिमुकला हर्षद दगावला. मात्र मातेसह पलाशची प्रकृती खालावल्याने त्यांना नागपुर येथे हलविण्यात आल्याची माहीती मिळाली आहे.

पती पत्नीच्या भांडणात मुलांचा बळी

पती पत्नीच्या भांडणात चिमुकला दगावल्याने नेहरु नगरात एकच खळबळ माजली आहे. मात्र तुमसर पोलिसांना घटनेची साधी माहितीच नसल्याचे कळले आहे. रागाच्या भरात मातेने घेतलेल्या निर्णयाचा भुर्दंड चिमुकल्या हर्षदला आपला जीव गमवुन भोगावा लागला.

First Published on: December 24, 2018 7:45 PM
Exit mobile version