निवडणूक निकालानंतर लालूप्रसाद यादव यांनी जेवण सोडलं

निवडणूक निकालानंतर लालूप्रसाद यादव यांनी जेवण सोडलं

सतराव्या लोकसभा निवडणुकीत भाजपला प्रचंड मतांनी यश आले. बिहारमध्ये देखील भाजपला तसेच यश आले. परंतु, या विजयानंतर बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी जेवण करणं सोडलं आहे. ते सध्या रांची येथील आरआयएमएस रुग्णालयात उपचार घेत आहेत. जेवण सोडल्यामुळे त्यांची प्रकृती ढासळत चालली आहे, असे डॉक्टरांनी सांगितले आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

लोकसभा निवडणुकीत बिहारमध्ये ४० जागांपैकी ३९ जागांवर एनडीएचे उमेदवार निवडूण आले आहेत. या निवडणुकीत लालू प्रसाद यादव यांच्या पक्षाला एकही जागा न मिळाल्याने त्यांचे मानसिक खच्चिकरण झाले आहे. त्यामुळे त्यांनी जेवण करणं देखील सोडलं आहे. यासंदर्भात डॉक्टर उमेश प्रसाद यांनी सांगितले की, ‘लालूप्रसाद यादव यांची दैनंदिनी पूर्णपणे बदलली आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून ते सकाळी पोटभर जेवतही नाहीत. ते सकाळी नाश्ता केल्यानंतर थेट रात्रीच जेवतात. त्यामुळे त्यांना इन्सुलिन देणं कठीण होतं.’ आम्ही लालूप्रसाद यादव यांची समजूत काढण्याचा पूर्णपणे प्रयत्न करत आहोत, असेही डॉक्टरांनी सांगितले.

First Published on: May 26, 2019 12:34 PM
Exit mobile version