भाजपाला धक्का; डेलकर कुटुंबाचा शिवसेनेत प्रवेश

भाजपाला धक्का; डेलकर कुटुंबाचा शिवसेनेत प्रवेश

भाजपाला धक्का; डेलकर कुटुंबाचा शिवसेनेत प्रवेश

मुंबईत येऊन आत्महत्या केलेले दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांच्या पत्नी कलाबेन आणि मुलगा अभिनव यांनी गुरूवारी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. दादरा नगर हवेली लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक लागली असून या पार्श्वभूमीवर डेलकर यांच्या पत्नी आणि मुलाने शिवसेनेत प्रवेश केलेला प्रवेश महत्वाचा मानला जात असून या प्रवेशानंतर लगेचच कलाबेन डेलकर यांना शिवसेनेकडून उमेदवारीही घोषित करण्यात आली.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ट्विटरच्या माध्यमातून कलाबेन डेलकर आणि अभिनव डेलकर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याची माहिती दिली . त्याचबरोबर कलाबेन डेलकर यांना दादरा नगर हवेली पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी घोषित करण्यात आल्याचंही संजय राऊत यांनी यावेळी सांगितलं. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.

दरम्यान, मोहन डेलकर यांच्या आत्महत्येनंतर राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. शिवसेनेकडून भाजप नेत्यांवर गंभीर आरोप करण्यात आले होते. त्या पार्श्वभूमीवर आता डेलकर यांच्या पत्नी आणि मुलाने शिवसेनेत प्रवेश केला आहे. गळफास घेऊन आत्महत्या करणारे ५८ वर्षीय मोहन डेलकर हे दादरा आणि नगर हवेलीचे खासदार होते. १९८९ मध्ये डेलकर पहिल्यांदा खासदारपदी निवडून आले होते. ते सलग सहा वेळा खासदारपदी निवडून आले होते. मोहन डेलकर हे काँग्रेस, भाजप, भारतीय नवशक्ति पक्ष यांच्या तिकीटावर खासदार झाले होते. मात्र २०१९ मध्ये ते अपक्ष लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आणि विजयी झाले होते.


 

First Published on: October 7, 2021 8:51 PM
Exit mobile version