करोनाचे सावट, कर्मचाऱ्यांना दिली १४ दिवसांची रजा

करोनाचे सावट, कर्मचाऱ्यांना दिली १४ दिवसांची रजा

भारतीय कंपन्यांची करोनासाठी सावधगिरीचा उपाय

भारतातील पेटीएम, विप्रो, टीसीएस, एचसीएल यासारख्या कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी करोना प्रतिबंधक असा सुरक्षिततेचा उपाय म्हणून एक्शन प्लॅन जाहीर केला आहे. सावधानतेचा उपाय म्हणून पेटीएमने १४ दिवस कार्यालय बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. विप्रोनेही आपल्या कर्मचाऱ्यांचे चीन, हॉंग कॉंग आणि मकाउ येथील दौरे रद्द केल्याचे जाहीर केले आहे. कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम म्हणून घरूनच काम करण्याचा सल्ला दिला आहे. आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांना घरातूनच काम करण्याचा सल्ला दिला आहे. म्हणूनच १४ दिवसांनंतरच कर्मचाऱ्यांना ड्युटीवर येण्याचा सल्ला दिला आहे. चीनसारख्या देशात जाऊन आलेल्या कर्मचाऱ्यांना हा सल्ला देण्यात आल्याचे विप्रोने जाहीर केले आहे. टाटा कन्सलटन्सी सर्व्हीसेसनेही आपण सर्व खबरदारी घेत असल्याचे जाहीर केले. तर एचसीएल टेक्नॉलॉजीने सर्व बाधित क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी पुर्णपणे सहकार्य करण्याचे जाहीर केले आहे.

भारतातील आघाडीची डिजिटल पेमेंट बॅंक असलेल्या पेटीएमने आज आपले गुरगाव नॉयडा येथील कार्यालय आगामी कालावधीसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पेटीएमच्या कार्यालयातील काही कर्मचाऱ्यांनी नुकताच इटली दौरा केला होता. त्याठिकाणी पेटीएमच्या कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. हे दोन्ही कर्मचारी करोनाच्या चाचणीत पॉझिटीव्ह आढळले आहेत.

इटली दौऱ्यासाठी पाठवण्यात कर्मचाऱ्यांची नुकतीच चाचणी करण्यात आली आहे. या चाचणीनंतर पेटीएमचे कार्यालय दोन दिवसासाठी बंद ठेवण्यात आले आहे. आता संपुर्ण स्वच्छतेनंतरच हे कार्यालय खुले करण्यात येईल असे आरोग्य मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. पेटीएमच्या प्रवक्त्यानेही कर्मचाऱ्यांना करोना व्हायरसची लागण झाल्याच्या वृत्तावर शिक्कामोर्तब केले आहे. या कर्मचाऱ्यावर सध्या उपचार सुरू असून त्यांच्या चाचण्या या सकारात्मक आल्या आहेत असे पेटीएमकडून स्पष्ट करण्यात आले आहे. सुरक्षिततेसाठी आम्ही सर्व कर्मचाऱ्यांसाठी चाचण्या करण्यासाठी सांगण्यात आले आहे. पेटीएमची सेवा नेहमीप्रमाणेच सुरू राहील असे सांगण्यात आले आहे. पण या सगळ्या ऑफिस बंदीचा आमच्या दैनंदिन कामकाजावर कोणताही परिणाम झालेला नाही असेही जाहीर करण्यात आले आहे.

First Published on: March 4, 2020 10:09 PM
Exit mobile version