सिंधुदुर्ग जिल्ह्यात बिबट्याचा मुक्त संचार, Video व्हायरल

सिंधुदुर्ग जिल्ह्यात बिबट्याचा मुक्त संचार, Video व्हायरल

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली चौकुळ-कुंभवडे गावात दिवसाढवळ्या भर रस्त्यात बिबट्याचे दर्शन झाल्याने ग्रामस्थ दहशती खाली आहेत. चौकुळचे माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य विजय गावडे चौकुळ-कुंभवड़े रस्त्यावरुन येत असताना त्यानां हा बिबटया दिसला असता त्यानी त्याची छबी आपल्या मोबाईल मध्ये टिपली आहे. दरम्यान सद्यस्थितीत हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

दरम्यान, आंबोली चौकुळ कुंभवडे आदी परिसरात वाघ, बिबट्याचे अस्तीत्व अधोरेखित झाले आहे. या अगोदर याच भागात ब्लैक पैंथर ही नजरेस पड़ला होता. श्री. गावडे हे आपल्या कार मधून काही कामानिमित्त कुंभवडे परिसरात गेले होते. त्या ठिकाणाहून परतत असताना त्यांना भररस्त्यात बिबट्याचे दर्शन झाले. त्यावेळी त्यांनी बिबट्याची छबी मोबाईलमध्ये कैद केली आहे.


हेही वाचा : ७६० मेगावॅट वीज खरेदीला मान्यता, राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय


 

First Published on: April 8, 2022 10:46 PM
Exit mobile version