Unlock: राज्यात उद्यापासून ग्रंथालये सुरू; सरकारचे नवे आदेश

Unlock: राज्यात उद्यापासून ग्रंथालये सुरू; सरकारचे नवे आदेश

महाराष्ट्र मिशन बिगन अगेनच्या दिशेने वाटचाल करत असताना आणखी एक आनंदाची बातमी नागरिकांसाठी राज्य सरकारने दिली आहे. राज्यात गुरूवार, उद्यापासून ग्रंथालये सुरू करण्यात ठाकरे सरकारने परवानगी दिली असून नुकतेच सरकारने यासंबंधीचे नवे आदेश जारी केले आहे. त्यामुळे विद्यार्थी, पुस्तकप्रेमींसाठी ही दिलासादायक बाब आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात ग्रंथालये सुरू करण्याची मागणी होत होती. दरम्यान, या मागणीसाठी ग्रंथालयांच्या प्रतिनिधींनी गेल्या आठवड्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज या निवासस्थानी भेट घेतली होती. या भेटीत राज्यातील ग्रंथालयांच्या प्रतिनिधींनी ग्रंथालय पुन्हा सुरू करा, अशी मागणी करत राज यांना निवेदनही दिले होते.

या महिन्यातील १ तारखेपासून लॉकडानच्या पाचव्या टप्प्याला सुरुवात झाली असून ठाकरे सरकारकडून काही निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. राज्य सरकारने मेट्रो आणि ग्रंथालये सुरु करण्यासाठी परवानगी दिली असून यासंदर्भात राज्य सरकारकडून नवे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. मात्र राज्य सरकारने जारी केलेल्या परिपत्रकानुसार शाळा, महाविद्यालये तसेच शैक्षणिक आणि प्रशिक्षण संस्था ३१ ऑक्टोबरपर्यंत बंद राहणार आहेत. दरम्यान शाळांना ५० टक्के शिक्षक तसेच इतर कर्मचाऱ्यांना ऑनलाइन शिक्षण, टेली काऊन्सलिंग याशिवाय इतर कामांसाठी शाळेत बोलावण्याची परवानगी देण्यात आली आहे.

हेही वाचा –

Breaking: १ कोटींच्या खंडणीसाठी गिरीश महाजन यांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी

First Published on: October 14, 2020 4:17 PM
Exit mobile version