Coronavirus: Live update – नाशिकमध्ये पहिला करोना पॉझिटिव्ह रुग्ण!

Coronavirus: Live update – नाशिकमध्ये पहिला करोना पॉझिटिव्ह रुग्ण!

CoronaVirus: आग्रा होऊ शकतं भारताचं वुहान!

इस्लामपूर शहरात आजपातून तीन दिवस संचारबंदी लागू करण्यात आली आहे. प्रशासनच्या अहवालातून धक्कादायक माहिती समोर आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे पुढील तीन दिवस इस्लामपूर शहर पुर्णत: बंद असेल.    

नाशिकमध्ये पहिला करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे. या रुग्णा कोणत्याही परदेशी प्रवासाची पार्श्वभूमी नाही आहे.

सविस्तर वाचा

Corona: नाशिकमध्ये पहिला कोरोना रुग्ण सापडला; परदेश प्रवासाची पार्श्वभूमी नाही!

A view of the sea
Priyanka Shinde

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील

मुंबई – ८५

पुणे (शहर आणि ग्रामीण भाग) – ३७

सांगली – २५

मुंबई वगळून ठाणे मंडळातील इतर मनपा – २३

नागपूर – १४

यवतमाळ – ४

अहमदनगर – ५

सातारा – २

औरंगाबाद, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, गोंदिया, जळगाव, बुलढाणा प्रत्येकी १

इतर राज्य – गुजरात १

एकूण २०३

Priyanka Shinde

राज्यात कोरोनाचे २२ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या २०३वर पोहोचली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत असलेल्या टोल नाक्यांवर माल वाहतूक करणाऱ्या वाहनांकडून आज मध्यरात्री १२ वाजल्यापासून टोल वसुली बंद करण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळच्या अधिपत्याखालील टोल नाक्यांवर माल वाहतूक करणाऱ्या वाहनांवरील टोल वसुलीस आज दिनांक २९ मार्च २०२० मध्यरात्री १२ वाजल्यापासून स्थगिती देण्यात येत आहे. टोलवसुलीच्या स्थगितीचे हे आदेश पुढील आदेश निर्गमित होईपर्यंत अंमलात राहतील, असे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने कळवण्यात आले आहे.

राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा १९६वर पोहोचला आहे. म्हणजेच राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा २००च्या उंबरठ्यावर आहे.

https://twitter.com/rajeshtope11/status/1244200383699812352

First Published on: March 29, 2020 8:05 AM
Exit mobile version