Live Update: आमदार बच्चू कडू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी थोड्याच वेळात दाखल होणार

Live Update: आमदार बच्चू कडू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी थोड्याच वेळात दाखल होणार

Live update Mumbai Maharashtra

आमदार बच्चू कडू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी थोड्याच वेळात दाखल होणार अमरावतीचे आमदार रवी राणा वर्षा निवासस्थानी थोड्याच वेळात दाखल होणार थोड्याच वेळात बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यात बैठक होणार
गुजरातच्या मोरबीमध्ये मच्छू नदीवरील पूल कोसळला; 100 हून अधिक नागरिक नदीत कोसळले गुजरातच्या मोरबीमध्ये मच्छू नदीवरील पूल कोसळला पूल कोसळला त्यावेळी पुलावर 500 जण असल्याची भिती व्यक्त केली जात आहे. 100 हून अधिक नागरिक नदीत कोसळले घटनास्थळी पोलीस आणि जीवरक्षकांनी शर्तीच्या प्रयत्नांवर बचाव कार्याला सुरूवात केली
बच्चू कडू आज रात्री 10 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेणार भारताला पहिला धक्का कर्णधार रोहित शर्मा १५ धावांवर झेलबाद
भारताने नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला
टी २० विश्वचषकात पाकिस्तानचा नेदरलँडवर विजय
अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात पुण्यात तक्रार दाखल नोटांवर लक्ष्मी आणि गणपतीचे फोटो छापण्याच्या मागणीवर इनक्रेडिबल संघटनेकडून तक्रार
अमरावतीमध्ये दोन मजली इमारत कोसळली ढिगाऱ्याखालून चार मृतदेह काढले
सोमालियात दहशतवादी हल्ला, १०० जणांचा मृत्यू
किशोरी पेडणेकर यांना १ नोव्हेंबरला चौकशीसाठी बोलावले- किरीट सोमय्या
उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांशी चर्चा केल्यानंतर कैलास पाटलांचं उपोषण मागे पीक विम्यासाठी गेल्या सात दिवसांपासून सुरू होतं उपोषण
नागपूरमध्ये झेडपी अध्यक्ष, उपाध्यक्षांच्या जीपमागे वाघ वाघाने केला पाठलाग नागपूरच्या उमरेड करांडलामधील घटना
आमदार भास्कर जाधव यांना कुडाळ पोलिसांनी बजावली नोटीस राणेंबाबत चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी भाजपा कार्यकर्त्यांनी केली होती तक्रार
किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात किरीट सोमय्या यांची तक्रार
रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी आहे. रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर आज मेगाब्लॉक घोषित करण्यात आला आहे. देखभालीचे काम करण्यासाठी उपनगरीय विभागांत मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा – मुलुंड स्थानकांदरम्यानच्या दोन्ही जलद मार्गावर तसेच हार्बरच्या कुर्ला – वाशीदरम्यानच्या दोन्ही मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे लोकल विलंबाने धावणार आहेत.
 
First Published on: October 30, 2022 11:03 PM
Exit mobile version