Live Update : राहुल गांधींची उद्या अमरावती आणि सोलापुरात जाहीर सभा

Live Update : राहुल गांधींची उद्या अमरावती आणि सोलापुरात जाहीर सभा

माय महानगर लाइव्ह अपडेट

राहुल गांधींची उद्या अमरावती आणि सोलापुरात जाहीर सभा

अमरावती मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत बसवंत वानखडे आणि सोलापूर मतदार संघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ राहुल गांधी उपस्थित राहणार आहेत

23/4/2024 19:36:26


CSK VS LSG : लखनऊ सुपर जायंट्सचा नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय

23/4/2024 19:1:29


एससी, एसटी, ओबीसी आरक्षण हटवणार नाही, ही मोदींची गॅरंटी आहे – अमित शहा

बहुमत मिळूनही 10 वर्षात आम्ही घटना बदलली नाही

23/4/2024 16:13:27


अमरावतीत बच्चू कडू आणि पोलिसांमध्ये वाद

सायन्सकोर मैदानात नवनीत राणा आणि बच्चू कडू यांची उद्या सभा

23/4/2024 15:53:52


अमित शहांच्या अकोल्यातील सभेपूर्वी जोरदार पाऊस

अमित शहा भाजपाचे अनूप धोत्रे यांच्या प्रचारासाठी अकोल्यात

23/4/2024 15:53:21


दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा तिहारमधील मुक्काम वाढला

7 मे पर्यंत न्यायालयीन कोठडीत वाढ

23/4/2024 14:19:48


नागपुरातील हनुमान मंदिरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आरती

हनुमान जन्मोत्सवानिमित्त घेतले दर्शन

23/4/2024 12:22:42


सलमान खानच्या घरावर गोळीबार करताना वापरण्यात आलेले दुसरे पिस्तुलही सापडले

आरोपींनी तापी नदीत फेकले होते पिस्तुल

पोलिसांना आतापर्यंत या कारवाईमध्ये दोन पिस्तुल आणि तीन मॅगजीन सापडले

23/4/2024 11:21:43


पार्थ पवारांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा

23/4/2024 10:21:29


निलेश लंके कोणतेही शक्तिप्रदर्शन न करता अहमदनगरमधून भरणार अर्ज

निलेश लंके अहमदनगरमधून मविआचे उमेदवार

23/4/2024 9:1:40


पुण्यातील खेड शिवापूर टोलनाक्याजवळ अल्कोहोलने भरलेला टँकर उलटला

टँकर उलटल्याने महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

चार क्रेनच्या सहाय्याने या टँकरला बाजूला करण्याचे काम सुरू

टँकरमधील अल्कोहोल रस्त्यावरती सांडले

या घटनेमुळे साताऱ्याहून पुण्याकडे जाणारी वाहतूक ठप्प

23/4/2024 7:54:19


सलमान खानच्या घरावर गोळीबार केलेले पिस्तुल सापडले

पिस्तुल शोधण्यात मुंबई गुन्हे शाखेला यश

23/4/2024 7:50:58


राज्यासह देशभरात हनुमान जन्मोत्सवाचा उत्साह

नाशिक येथील अंजनेरी पर्वतावर भाविकांची गर्दी

अंजनेरी पर्वतावर हनुमानाच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा

पहाटेपासूनच भाविकांची दर्शनासाठी गर्दी

23/4/2024 7:40:37


अकोल्यात आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सभा

महायुतीकडून असलेले भाजपाचे उमेदवार अनुप धोत्रेंच्या प्रचारार्थ शहा अकोल्यात येणार

दुपारी 3 वाजता अमित शहा यांची अकोल्यातील क्रिकेट क्लब मैदानावर जाहीर सभा

21 एप्रिलला याच मैदानावर योगी आदित्यनाथ यांची सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र काही कारणास्तव ही सभा ऐन वेळेवर रद्द करण्यात आली

23/4/2024 7:40:37

First Published on: April 23, 2024 7:43 AM
Exit mobile version