Live Update : आयएएस अधिकारी महेंद्र कल्याणकर आणि पी. वेलारसू यांची बदली

Live Update : आयएएस अधिकारी महेंद्र कल्याणकर आणि पी. वेलारसू यांची बदली

माय महानगर लाइव्ह अपडेट

आयएएस अधिकारी महेंद्र कल्याणकर आणि पी. वेलारसू यांची बदली

कोकण विभागीय आयुक्त महेंद्र कल्याणकर यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, मुंबई या पदावर नियुक्ती

आयएएस अधिकारी पी. वेलारसू यांची विभागीय आयुक्त, कोकण विभाग या पदावर नियुक्ती

29/4/2024 18:30:28


पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा

पुण्यातील रेसकोर्स मैदानावर होणार सभा

29/4/2024 18:20:0


पुण्यातील वंचितचे उमेदवार वसंत मोरे यांना निवडणुकीसाठी रोड रोलरचे चिन्ह

29/4/2024 17:43:4


पंकजा मुंडेंच्या सभास्थळी मराठा तरुणांची घोषणाबाजी

बीड जिल्ह्यातील किठ्ठी आडगावमधील सभेतला प्रकार

29/4/2024 17:25:0


उदयनराजे भोसले यांच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदी यांच्या कराडमध्ये सभा

उदयनराजे भोसले साताऱ्यातून महायुतीचे उमेदवार

29/4/2024 16:23:24


वर्षा गायकवाड यांच्या उमेदवारीविरोधात मुंबईत काँग्रेस नेत्यांची बैठक सुरू

नसीम खान, भाई जगताप, चंद्रकांत हंडोरेंची उपस्थिती

29/4/2024 15:48:27


अरविंद सावंत आणि अनिल देसाई यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल

दक्षिण मध्य मुंबईतून अनिल देसाई यांनी अर्ज भरला

29/4/2024 15:1:48


वंचित बहुजन आघाडीकडून मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार जाहीर

वंचितकडून सोनल गोंदाने यांना उमेदवारी

29/4/2024 14:47:48


काँग्रेसने जाती-जमातींचा विकास होऊ दिला नाही – नरेंद्र मोदी

गरिबांची सेवा करून मी त्यांचं कर्ज फेडतोय

मी गरीबांच्या खालेल्या मिठाला जगतोय

29/4/2024 14:33:34


पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापूरात दाखल

महायुतीचे उमेदवार राम सातपुतेंसाठी थोड्याच वेळात घेणार प्रचार सभा

29/4/2024 13:56:31


नागपूर विमानतळ बॉम्बने उडवून देण्याची धमकी

विमानतळ परिसरात बॉम्ब शोधक पथकाकडून तपासणी सुरू

29/4/2024 13:49:1


हार्बर रेल्वेवरील वाहतूक सुरळीत

डबा घसरल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती

29/4/2024 13:47:25


नारायण राणेंसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे घेणार सभा

राज ठाकरे 4 मे रोजी रत्नागिरी-सिंधुदूर्ग लोकसभेचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचारार्थ कणकवली येथे जाहीर सभा घेणार

29/4/2024 13:22:18


छत्रपती संभाजीनगरहून नागपूरकडे निघालेल्या हेलिकॉप्टरची इमर्जन्सी लॅडिंग

तांत्रिक बिघाडामुळे हेलिकॉप्टरची जालनामध्ये इमर्जन्सी लॅडिंग

पायलट आणि दोन कर्मचारी सुखरुप

मल्होत्रआ प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे आहे हेलिकॉप्टर

29/4/2024 13:20:56


शांतिगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने भरला अर्ज?

उमेदवारी अर्जासोबत एबी फॉर्म जोडलेला नाही

29/4/2024 12:52:28


अक्षय कांती बम यांचा भाजपामध्ये प्रवेश

इंदूरमधून उमेदवारी अर्ज घेतला मागे

राजस्थान भाजपा नेते कैलाश विजयवर्गीय यांची माहिती

29/4/2024 12:44:55


सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरल्याने हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत

पनवेलहून सीएसएमटी स्थानकाकडे जाणाऱ्या लोकलचा डबा घसरला

वडाळा ते सीएसएमटी मार्गावरील वाहतूक बंद

29/4/2024 12:28:51


दादरमध्ये सापडली 1 लाख 80 हजारांची रोख रक्कम

दादरच्या शिंदे वाडी परिसरत नाकाबंदीदरम्यान एका वाहनात रोकड सापडली

29/4/2024 12:20:21


शरद पवार गटाचे अभिजित पाटील देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला

सोलापुरातील हॉटेल बालाजी सरोवरमध्ये दोघांची भेट

29/4/2024 10:44:2


भ्रष्टाचाऱ्यांना मांडीवर बसवून भाजपा लढाई लढतेय – संजय राऊत

मोदींनी आधी अजित पवारांवर कारवाई करावी

फडणवीसांचं राजकारण भविष्यात फार नाही चारणार

अजित पवारांची ख्याती आता धमकीबहाद्दर

29/4/2024 10:43:35


चौथ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस

11 मतदारसंघातील मुख्य मढतीचं चित्र होणार स्पष्ट

29/4/2024 8:41:36


2040 मध्ये चंद्रावर उतरण्याचे भारताचे ध्येय आहे – एस सोमनाथ

चांद्रयान-4 हे या उद्दिष्टाच्या दिशेने पहिले पाऊल असेल.

खाजगी कंपन्या अंतरिक्षला अधिक सुलभ करतील आणि या क्षेत्रातील संशोधनाला गती देण्यास मदत करतील

29/4/2024 7:14:52


अमित शहांच्या एडिटेड व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल

तेलंगणा काँग्रेसकडून अमित शहांचा व्हिडीओ शेअर

29/4/2024 7:14:52


दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेविरोधात आज सुनावणी

29/4/2024 7:6:59

First Published on: April 29, 2024 7:14 AM
Exit mobile version