Live Update : पालघरचा महायुतीचा उमेदवार जाहीर

Live Update : पालघरचा महायुतीचा उमेदवार जाहीर

माय महानगर लाइव्ह अपडेट

पालघरचा महायुतीचा उमेदवार जाहीर

डॉ. हेमंत सावरा यांना भाजपाकडून उमेदवारी जाहीर

विद्यमान खासदार राजेंद्र गावीत यांचा पत्ता कट

2/5/2024 21:52:7


वंचितकडून ठाणे, कल्याणच्या उमेदवारांची घोषणा

वंचितकडून डॉ. मोहम्मद शेख यांना कल्याण लोकसभेची उमेदवारी

डॉ. रामराव केंद्रे यांना वंचितकडून ठाणे लोकसभेची उमेदवारी जाहीर

2/5/2024 21:18:16


काँग्रेसचे पुण्यातील नेते आबा बागुल पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी

2/5/2024 17:45:25


नरेश म्हस्केंना उमेदवारी दिल्याने नवी मुंबईतील भाजपा पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

नाराज असलेल्या 64 नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी दिले राजीनामे

शिवसेनेला मदत न करण्याची भाजपा पदाधिकाऱ्यांची भूमिका

2/5/2024 14:16:17


अहमदनगरमध्ये खासगी बसला भीषण आग

राहता तालुक्यातील निर्मळ पिंप्री येथील घटना

आगीत बस जळून खाक, सुर्दैवाने जिवीतहानी नाही

2/5/2024 14:3:53


श्रीकांत शिंदेंकडून उमेदवारी अर्ज दाखल

2/5/2024 11:45:4


ठाकरे गटाच्या जाहिरातीत पॉर्न अॅक्टरचा वापर – चित्रा वाघ

महिलांचा अपमान करण्याची एकही संधी ठाकरे गट सोडत नाही

आदुबाळ नाईट लाईफ प्रोडक्शनची निर्मिती

2/5/2024 11:44:34


मुंबईतील भाभा रुग्णालयात नर्सेसचं आंदोलन

महिला रुग्णाने मारहाण केल्याच्या निषेधार्थ नर्सेसचं आंदोलन

2/5/2024 11:21:4


निवडणूक आयोग हा मोदी-शहांच्या पकडीमध्ये गुदमरलाय – संजय राऊत

फडणवीस लवंगी फटाका इतकाही स्फोट करू शकत नाही

2/5/2024 8:41:47


झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या बहिणीला लोकसभेची उमेदवारी घोषित

झारखंड मुक्ती मोर्चाकडून (JMM) हेमंत सोरेन यांची बहीण अंजनी सोरेन यांना ओडिशातील मयूरभंज लोकसभा मतदारसंघातून उमेदवार घोषित

2/5/2024 7:17:42


लीलावती रुग्णालयातील माजी विश्वस्त मंडळाकडून 500 कोटींचा अपहार

लीलावती रुग्णालयाच्या नवनिर्वाचित विश्वस्तांचा आरोप

2/5/2024 7:9:32

First Published on: May 2, 2024 7:17 AM
Exit mobile version