Live Update : भारताचा अफगाणिस्तानविरुद्ध मालिका विजय

Live Update : भारताचा अफगाणिस्तानविरुद्ध मालिका विजय

Live Update

भारताचा अफगाणिस्तानविरुद्ध मालिका विजय

अफगाणिस्तानसोबत सुरु असलेल्या तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेत भारताने सलग दुसरा विजय मिळवला

भारताने 15.4 षटकात चार विकेट गमावत 173 धावा करून सामना जिंकला


भारताने आमच्या सीमेवरील सैन्यं मागं घ्यावं

मालदिवचे राष्ट्रपती यांचा भारताला इशारा

चीन दौऱ्यावरुन येताच बदलली भूमिका


कबड्डी स्पर्धेदरम्यान कोसळली प्रेक्षक गॅलरी

अकोला जिल्ह्यातील दगडपारवा गावातील घटना

30 ते 35 प्रेक्षक जखमी तर 10 जण गंभीर जखमी


राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेला मणिपूरमधून थोड्याच वेळात होणार सुरुवात


मिलिंद देवरा यांच्यासह अनेकांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

मिलिंद देवरा यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

मिलिंद देवरा वर्षा बंगल्यावर दाखल


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली ‘आरोग्य आपल्या दारी’ या नव्या अभियानाची घोषणा

आरोग्य आपल्या दारी अभियानाअंतर्गत घरोघरी जाऊन केली जाणार नागरिकांच्या आरोग्याची तपासणी


पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहोचले केंद्रीय राज्यमंत्री एल मुरुगन यांच्या घरी

केंद्रीय राज्यमंत्री एल मुरुगन यांच्या घरी सुरू असलेल्या पोंगल उत्सवात घेतला सहभाग

पुद्दुचेरीचे लेफ्टनंट गव्हर्नर आणि तेलंगणाच्या राज्यपाल तमिलिसाई सुंदरराजनही पंतप्रधानांसोबत उपस्थित


मिलिंद देवरांकडून बाळासाहेबांना अभिवादन


पुण्यातील मोतीबाग कार्यालयात आरएसएसची महत्त्वाची बैठक सुरू

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरएसएसची महत्त्वाची बैठक

बैठकीला भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह आरएसएसचे पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित


मिलिंद देवरा सिध्दिविनायक मंदिरात दाखल

मी विकासाच्या मार्गावर जात आहे, मिलिंद देवरांची पहिली प्रतिक्रिया

मिलिंद देवरा सिध्दिविनायक मंदिराच्या दिशेने रवाना

काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांचा काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा


राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’ला आजपासून सुरुवात

हिंसाचारग्रस्त मणिपूरमधून काँग्रेसच्या न्याय यात्रेला राहुल गांधींच्या नेतृत्वात होणार सुरुवात

लोकसभा निवडणुकीच्या आधी बेरोजगारी, महागाई आणि सामाजिक न्याय हे मुद्दे यात्रेच्या माध्यमातून उपस्थित केले जाणार

न्याय यात्रा पूर्व ते पश्चिम दिशेने 15 राज्यांमधून जाईल आणि मुंबईमध्ये यात्रेची होणार सांगता

यात्रेची सुरुवात इम्फाळमधून न होता थौबल जिल्ह्यातून होणार असल्याची माहिती

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि पक्षाचे वरिष्ठ नेते शुभारंभाला राहणार उपस्थित


डॉ. बाबासाहेब आंबडेकर मराठवाडा विद्यापीठाचा आज 30वा नामांतर दिन

दरवर्षी 14 जानेवारीला नामांतर दिन साजरा केला जातो.

विद्यापीठ गेटसमोरील स्माकराला तसेच या लढ्यातील शहीदांना वंदन करण्यासाठी लाखो आंबेडकरी अनुयायी येणार असल्याची माहिती


भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज पुणे दौरा

हर मंदिर स्वच्छ अभियानाचा बावनकुळेंच्या हस्ते होणार शुभारंभ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिक येथील युवा महोत्सवातून केले होते हर मंदिर स्वच्छ अभियानाचे आवाहन


देशातील सर्वच मंदिरात राबवले जाणार अभियान

देशातील हवामानात बदल होत असून गारठा वाढण्याची शक्यता

दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाबसह जम्मू-काश्मीरमध्ये थंडीची लाट

हवामान विभागानुसार पुढील 4 ते 5 दिवसांत उत्तर भारतात दाट धुके कायम राहण्याची शक्यता

पुढील 4 दिवसांत उत्तर-पश्चिम भारतातील मैदानी भागात थंडीच्या तीव्र लाटेची शक्यता

उत्तर आणि दक्षिण पंजाब तसेच बिहारमध्ये काही ठिकाणी थंडीत होणार वाढ


नवी मुंबईच्या उलवे भागात राहणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाची कार्यालयात गोळ्या झाडून हत्या

अज्ञात आरोपीविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल

सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून पोलिसांकडून तपास सुरू

First Published on: January 14, 2024 8:26 AM
Exit mobile version