राज्यात ८ की १५ दिवसांचा लॉकडाऊन ? टास्क फोर्समध्ये दोन मतप्रवाह

राज्यात ८ की १५ दिवसांचा लॉकडाऊन ? टास्क फोर्समध्ये दोन मतप्रवाह

लॉकडाऊनबाबत निर्णय घेण्यासाठी आज रविवारी मुख्यमंत्री आणि टास्क फोर्सचे सदस्य यांच्यात बैठक पार पडली. या बैठकीत टास्क फोर्सची टीम विभागलेली अशी पहायला मिळाली. टास्क फोर्सच्या सदस्यांमध्ये तीन सदस्य हे ८ दिवसांचा लॉकडाऊन करण्याच्या बाजूने होते. तर तीन सदस्यांकडून १४ दिवसांच्या लॉकडाऊनसाठीची मागणी पुढे आली. पण मुख्यमंत्र्यांकडून मात्र लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय असे वारंवार सांगण्यात आले आहे. त्यामुळे सध्याचे राज्यात असलेले अनेक गोष्टींच्या बाबतीतले कडक निर्बंध आणि विकेंड लॉकडाऊन पाहता मुख्यमंत्री काय निर्णय घेतात हे पाहणे महत्वाचे असेल. मुख्यमंत्र्यांकडून लवकरच लॉकडाऊनबाबतचा निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे. टास्क फोर्सच्या सदस्यांसोबत बोलून निर्णय घेण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी याआधीच स्पष्ट केले होते. त्यानुसारच राज्यात ८ दिवस किंवा १४ दिवसांचा लॉकडाऊन हा कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लागू शकतो. राज्यातील आरोग्य यंत्रणेची स्थिती आणि कोरोना रूग्णांची संख्या पाहता राज्यात लॉकडाऊनबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री जाहीर करणे अपेक्षित आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि टास्क फोर्सच्या टीममध्ये आज रविवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास लॉकडाऊनबाबतच्या बैठकीला सुरूवात झाली. टास्क फोर्सच्या बैठकीत लॉकडाऊनचा नेमका कालावधी किती असावा तसेच सद्य परिस्थिती पाहता आणखी कोणत्या उपाययोजनांची पूर्तता करणे गरजेचे आहे यावर विचारमंथन झाले. राज्यात कोरोनाची दुसरी लाट पाहता ही कोरोनाची साखळी तोडण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून ब्रेक द चैन ही स्टॅण्डर्ड ऑपरेटींग प्रोसिजर (SOP) जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये काही गोष्टींवर निर्बंध आणतानाच अत्यावश्यक सेवेतील गोष्टींसाठी मुभा देण्यात आली आहे. तर दुसरीकडे विकेंड लॉकडाऊनचाही पर्याय मुंबईसह संपुर्ण राज्यात अवलंबण्यात आलेला आहे. अशा स्थितीत कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नेमका किती दिवसांचा लॉकडाऊन करावा यासाठीचेच विचारमंथन टास्क फोर्सच्या बैठकीत अपेक्षित आहे. टास्क फोर्सच्या बैठकीला राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासह राज्याचे आरोग्य सचिव डॉ प्रदीप व्यास यांचीही उपस्थिती आहे. तसेच टास्क फोर्सच्या सदस्यापैकी डॉ संजय ओक, डॉ तात्याराव लहाने, डॉ शशांक जोशी, डॉ राहुल पंडित, डॉ अविनाश सुपे आदींचीही हजेरी आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून मुख्यमंत्री या टास्कफोर्सच्या टीमसोबत संवाद साधत आहेत.

कोरोनाची परिस्थिती हाताळण्यासाठी राज्यात निर्माण झालेला रेमेडिसीवीर इंजेक्शनचा तुटवडा, रूग्णांसाठीचा बेड्सचा तुटवडा, ऑक्सिजनची मर्यादित उपलब्धतता यासारख्या परिस्थितीमुळे राज्यासमोरील कोरोना परिस्थिती हाताळण्याची आव्हाने दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामध्येच कोरोना रोखण्यासाठी गर्दी नियंत्रणात ठेवण्यात नियंत्रण मिळवण्यात स्थानिय स्वराज्य संस्थांना आव्हाने येत असल्यानेच लॉकडाऊनच्या पर्यायाचा विचार मुख्यमंत्री घेऊ शकतात. मुंबईसह अनेक मोठ्या शहरात असणाऱ्या स्थलांतरीत मजुरांचा प्रश्न कसा हाताळायचा यावरही उत्तर शोधण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून सुरू आहे. टास्क फोर्सचे सदस्य असलेल्या डॉ तात्याराव लहाने यांनीही १४ दिवसांच्या लॉकडाऊनला


 

First Published on: April 11, 2021 5:58 PM
Exit mobile version