Yavatmal-Washim Voting : यवतमाळ-वाशिममध्ये सरासरी ५३.७८ टक्के मतदान

Yavatmal-Washim Voting : यवतमाळ-वाशिममध्ये सरासरी ५३.७८ टक्के मतदान
पहिल्या तासातच यवतमाळ-वाशिममधील एका मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्याचे समजते.
यवतमाळ-वाशिममध्येही सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. वाशिम जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. यवतमाळ-वाशिम मतदारसंघाची २००८ साली निर्मिती झाली आहे. शिवसेनेच्या भावना गवळी या या मतदारसंघाच्या खासदार आहेत. यवतमाळ-वाशिम विधानसभा मतदारसंघात ४ ठिकाणी भाजपची सत्ता आहे. तर एका ठिकाणी शिवसेना आणि एका ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. यंदाही शिवसेनेच्या भावना गवळी यांची लढत काँग्रेसचे माणिकराव ठाकरे यांच्याशी आहे. तर प्रहारच्या वैशाली येडे आणि व्हीबीएच्या प्रवीण पवार हेदेखील निवडणूकीच्या रिंगणात उतरले आहेत.
यवतमाळ लोकसभा मतदारसंघ

यवतमाळ-वाशिममध्ये सरासरी ५३.७८ टक्के मतदान झाले आहे.

यवतमाळमध्ये संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ५४ टक्के मतदान झाल्याची माहिती मिळत आहे.


Chetan Patil

यवतमाळमध्ये दुपारी ३ वाजेपर्यंत ४३. २ टक्के मतदान झाल्याची माहिती मिळत आहे.

Rashmi Mane

यवतमाळ-वाशिम या मतदार संघात सकाळी ११ वाजेपर्यंत १२.०६ टक्के मतदान झाले आहे.

Rashmi Mane

यवतमाळमध्ये सकाळी ९ वाजेपर्यंत ६.३१ टक्के मतदान झाले आहे.

First Published on: April 11, 2019 8:12 AM
Exit mobile version