Lok Sabha : अमित शहांकडून ठाकरेंना डिवचण्याचा प्रयत्न; सभेत दिला जय भवानी जय शिवाजीचा नारा

Lok Sabha : अमित शहांकडून ठाकरेंना डिवचण्याचा प्रयत्न; सभेत दिला जय भवानी जय शिवाजीचा नारा

अकोला : ठाकरे गटाने मागील आठवड्यात प्रचारासाठी तयार केलेले मशाल गीत प्रसिद्ध केले. त्यांच्या या मशाल गीतातील हिंदू धर्म आणि जय भवानी हे दोन शब्द काढून टाकावे, असे आदेश निवडणूक आयोगाकडून देण्यात आले. याप्रकरणी ठाकरेंकडून निवडणूक आयोगावरच ताशेरे ओढण्यात आले. हे प्रकरण ताजे असतानाच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. अकोल्यातील सभेत संबोधित करताना अमित शहांनी जय भवानी-जय शिवाजी अशी घोषणाबाजी केली. (Lok Sabha ELection 2024 Amit Shah criticized Uddhav Thackeray by chanting Jai Bhavani Jai Shivaji)

अकोल्यातील सभेत आज अमित शाह यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेत जय भवानी, जय शिवाजी अशी घोषणाबाजी केली. लोकसभा निवडणुकीत तुम्ही मोदींसोबत आहात का? मोदींना आशीर्वाद देणार का? तुम्ही कमळाच्या चिन्हासमोरील बटण दाबणार का? असे प्रश्न उपस्थित करत काँग्रेसवर निशाणा साधला. अकोल्यात बटण दाबा, करंट इलटीत जाईल, असा टोला अमित शहा यांनी लगावला.

हेही वाचा – Bacchu Kadu : हनुमानाने…; अमित शहांच्या सभेचा मंडप कोसळल्याने बच्चू कडूंची खोचक टीका

उद्धव ठाकरेंना डिवचण्याचा प्रयत्न

निवडणूक आयोगाने मशाल गीतातील हिंदू धर्म आणि जय भवानी हे दोन शब्द काढण्याचे आदेश दिले आहेत. असे असले तरी मी काहीही झाले तरी जय भवानी शब्द काढणार नाही, असे उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केले आहे. हे प्रकरण सुरू असतानाच अमित शहा यांनी अकोल्यातील सभेत दोन्ही हात वर करत उपस्थितांना त्यांच्यासोबत भारत माता की जय, वंदे मातरम, जय शिवाजी, जय भवानी, जय जय जय जय जय शिवाजी, जय जय जय जय जय भवानी अशी घोषणाबाजी करत उद्धव ठाकरेंवरही निशाणा साधला. त्यामुळे आता उद्धव ठाकरे त्यांना कशा पद्धतीने प्रत्युत्तर देतात हे पाहावे लागेल.

मोदी-शहांचे सध्या महाराष्ट्रावर लक्ष

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील 48 पैकी सर्वाधिक जागा जिंकण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सध्या महाराष्ट्रावर लक्ष केंद्रीय केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नागपूर, रामटेक, वर्धा, नांदेड, परभणी याठिकाणी जाहीर सभा घेत भाजपाला पुन्हा एकदा निवडून देण्याचं आवाहन केलं आहे. तर, अमित शाह यांनी आज अकोल्यातील सभेला संबोधित केल्यानंतर ते उद्या अमरावतीत नवनीत राणांसाठी प्रचार करणार आहेत. दरम्यान, अकोल्यातील सभेत अमित शहा यांनी देशाच्या सर्वांगिण विकासासाठी मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याचे आवाहन केले आहे.

हेही वाचा – BJP VS Congress : संविधान बदलणाऱ्या काँग्रेसचाच भाजपाविरोधात अपप्रचार; विनोद तावडेंची टीका

Edited By – Rohit Patil

First Published on: April 23, 2024 9:58 PM
Exit mobile version