Lok Sabha 2024 : शरद पवारांच्या राजकीय आयुष्यात शपथेला नाही, खंजीराला महत्व; जाहीरनाम्यावर भाजपाची टीका

Lok Sabha 2024 : शरद पवारांच्या राजकीय आयुष्यात शपथेला नाही, खंजीराला महत्व; जाहीरनाम्यावर भाजपाची टीका

मुंबई : शरद पवारांच्या राजकीय आयुष्यात शपथेला नाही, खंजीराला महत्व आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने “शपथनामा” नावाने लोकसभा निवडणुकीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. जगातील ही सगळ्यात मोठी फसवणूक म्हटली पाहिजे. खरंच शरद पवार आणि शपथेचा काही संबंध आहे का? अशा शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या शपथपत्रावर (जाहीरनामा) टीका केली. (Lok Sabha Election 2024 Bjp Leader Chandrashekhar Bawankule Slams NCP Sharad Pawar Manifesto)

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विटरच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या शपथपत्रावर (जाहीरनामा) टीका केली आहे. “शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने “शपथनामा” नावाने लोकसभा निवडणुकीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. जगातील ही सगळ्यात मोठी फसवणूक म्हटली पाहिजे. खरंच शरद पवार आणि शपथेचा काही संबंध आहे का? महाराष्ट्रात शपथेला प्राणापेक्षा अधिक महत्व आहे. 26 एप्रिल 1645 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांसह हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली ती पूर्ण केली. आणि शरद पवारांच्या राजकीय आयुष्यात शपथेला नाही, खंजीराला महत्व आहे”, अशा शब्दांत चंद्रशेखर बावनकुळेंनी टीका केली.

हेही वाचा – Lok Sabah 2024 : घरगुती गॅस आणि पेट्रोल-डिझेलच्या दरांबाबत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातून मोठं आश्वासन

चंद्रशेखर बावनकुळेंच्या ट्वीटमध्ये नेमकं काय?

शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने “शपथनामा” नावाने लोकसभा निववडणुकीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. जगातील ही सगळ्यात मोठी फसवणूक म्हटली पाहिजे. खरंच शरद पवार आणि शपथेचा काही संबंध आहे का? महाराष्ट्रात शपथेला प्राणापेक्षा अधिक महत्व आहे. 26 एप्रिल 1645 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांसह हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली ती पूर्ण केली. आणि शरद पवारांच्या राजकीय आयुष्यात शपथेला नाही, खंजीराला महत्व आहे.

1977 मध्ये आणीबाणी नंतर काँग्रेस पक्ष फुटला. इंदिरा गांधी यांची साथ सोडून शरद पवार ब्रह्मानंद रेड्डी यांच्या रेड्डी काँग्रेसमध्ये गेले.

1978 मध्ये मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसून वसंतदादांचे सरकार पाडले.

1980 मध्ये 40 आमदारांसह बंडखोरी करत पुलोद सरकार स्थापन करून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले.

1988 मध्ये शरद पवार पुलोदमधून पुन्हा काँग्रेसमध्ये गेले.

1999 मध्ये काँग्रेसमधून पुन्हा बाहेर राष्ट्रवादीची स्थापना केली.

2019 मध्ये अजितदादांना शब्द दिला.. आणि फिरवला!

2019 मध्ये महाविकास आघाडीची स्थापना केली.

खरंच सांगा, शरद पवार आणि शपथेचा काही संबंध आहे का?

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यात या मुद्द्यांवर भर

लोकसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा जाहीरनामा आज (25 एप्रिल) पुण्यात प्रकाशित करण्यात आला. राष्ट्रवादी शरद पवार गटाने आपल्या जाहीरनाम्याला ‘शपथपत्र’ असे नाव दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या जाहीरनाम्यातील माहिती दिली. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने आपल्या जाहीरनाम्यात महागाई, घरगुती गॅस दरवाढ, पट्रोल-डिझेल दरवाढ, शासकीय रिक्त जागा यांसह अनेक विषयांवर लक्ष दिले आहे.


हेही वाचा – Lok Sabha 2024 : मनाविरुद्ध नारायण राणे निवडणुकीच्या रिंगणात, खंत असलेले भाजपाचे दुसरे नेते

Edited By – Vaibhav Patil

First Published on: April 25, 2024 1:19 PM
Exit mobile version