Lok Sabha 2024 : लोकसभेत शिवसेना किती जागा लढवणार? मुख्यमंत्री शिंदेंनी दिले उत्तर; वाचा सविस्तर

Lok Sabha 2024 : लोकसभेत शिवसेना किती जागा लढवणार? मुख्यमंत्री शिंदेंनी दिले उत्तर; वाचा सविस्तर

मुंबई : लोकसभा निवडणूक 2024 च्या पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतरही महायुतीत अनेक जागांवरील वाद कायम आहे. अशात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना महायुतीतून एकूण किती जागा लढवणार असा सवाल वारंवार उपस्थित केला जात होता. विशेष म्हणजे या प्रश्नावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर विरोधक टीकाही करत होते. अखेर या प्रश्नाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर देत, शिवसेना लोकसभा निवडणून 2024मध्ये किती जागा लढवणार याबाबत माहिती दिली आहे. (lok Sabha election 2024 CM Eknath Shinde criticized on Uddhav Thackeray)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत शिवसेना लोकसभा निवडणून 2024मध्ये किती जागा लढवणार याबाबत माहिती दिली आहे. त्यानुसार, “राज्यात शिवसेना 16 जागा लढवणार आहे. यामध्ये मुंबईतील तीन जागांचाही समावेश असून जागावाटपावरून महायुतीतील मित्रपक्षांमध्ये कोणतेही मतभेद नाही. तसेच, विकासाच्या मुद्द्यावर प्रचार करून 42 जागा जिंकून 2019 चा विक्रम मोडणार आहोत”, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : बँक खाते व्यवहारावर निवडणूक आयोगाची करडी नजर

विशेष म्हणजे यंदाच्या लोकसभेत शिवसेना किता जागांवर निवडणूक लढणार याबाबत माहिती देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली आहे. “उद्धव ठाकरेंचे मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न होते. महाविकास आघाडीची स्थापना ही पूर्वनियोजित खेळी होती. वडिलांप्रमाणे किंगमेकर बनण्याऐवजी उद्धव ठाकरे यांना स्वतः किंग व्हायचे आहे”, अशी टीका मुख्यमंत्री शिंदेंनी ठाकरेंवर केला. त्याचप्रमाणे “महाविकास आघाडी सरकारने जून २०२२ मध्ये भाजपा नेते आशिष शेलार, गिरीश महाजन, प्रवीण दरेकर आणि देवेंद्र फडणवीस यांना अटक करण्याचा कट रचला होता, असा गौप्यस्फोटही एकनाथ शिंदे यांनी केला.

दरम्यान, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने 22 जागांवर निवडणूक लढवली होती. त्यापैकी 18 जागांवर विजय मिळवला होता. मात्र, यंदाच्या लोकसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शिवसेना केवळ 16 जागांवर निवडणूक लढवते आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर विरोधकांकडून टीक होत आहे. अशात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेना यंदाच्या लोकसभेत 21 जागांवर लोकसभा निवडणूक लढवत आहे.


हेही वाचा – Sangli Lok Sabha 2024 : अर्ज मागे घ्या अन्यथा…; विशाल पाटलांना काँग्रेसचा इशारा

Edited By – Vaibhav Patil 

First Published on: April 22, 2024 2:11 PM
Exit mobile version