Lok Sabha 2024 : काँग्रेसची चिंता मिटली, नसीम खान करणार वर्षा गायकवाडांचा प्रचार

Lok Sabha 2024 : काँग्रेसची चिंता मिटली, नसीम खान करणार वर्षा गायकवाडांचा प्रचार

नसीम खान करणार वर्षा गायकवाडांचा प्रचार

मुंबई : काँग्रेस नेते नसीम खान यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या स्टार प्रचारकाचा राजीनामा देत पक्षाविरोधात आपली उघड नाराजी व्यक्त केली होती. त्यांच्या या नाराजीमुळे उत्तर मध्य मुंबई लोकसभेत काँग्रेसची डोकेदुखी वाढली होती. पण आता काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींकडूनच चांदिवली विधानसभेचे माजी आमदार नसीम खान यांची नाराजी दूर करण्यात आली आहे. ज्यामुळे लोकसभा निवडणुकीतील काँग्रेसची चिंता मिटली असून नसीम खान आता उत्तर मध्य मुंबईत वर्षा गायकवाड यांचा प्रचार करणार आहेत. तर, त्यांनी स्टार प्रचारकाचा दिलेला राजीनामा देखील मागे घेतला आहे. (Lok Sabha Election 2024 Congress succeeded in removing Naseem Khan displeasure)

उत्तर मध्य मुंबई लोकसभेतून मविआकडून काँग्रेसतर्फे वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. ज्यामुळे नाराज झालेले काँग्रेसचे माजी आमदार नसीम खान यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत आपली नाराजी व्यक्त केली. परंतु, महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघापैकी एकाही मतदारसंघात काँग्रेसने किंवा मविआने अल्पसंख्यांक उमेदवार न दिल्याने मी नाराज असल्याचे नसीम खान यांच्याकडून सांगण्यात आले, त्यामुळे काँग्रेससोबतच मविआच्या गोटात खळबळ उडाली. पण ऐनवेळी नसीम खान यांचा पत्ता कट करत वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर झाल्याने ते नाराज असल्याचे बोलले गेले.

हेही वाचा… Lok Sabha 2024: बारामतीत सुप्रिया सुळेंना ही भीती; मतदानाच्या आदल्या दिवशी निवडणूक आयोगाकडे तक्रार

पण आता काँग्रेस महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांनी नसीम खान यांची भेट घेत त्यांच्यासोबत चर्ता केली. या चर्चेतून नसीम खान यांचे समाधान झाले असून त्यांनी आपला राजीनामा घेतला. तसेच, काही दिवसांपूर्वी मी अल्पसंख्यक समाजाची भावना व्यक्त केली. ज्येष्ठ नेत्यांपुढे माझी भावना व्यक्त केली. माझ्या पक्षाचे अध्यक्ष खर्गे जी, वेणूगोपाल जी, रमेश चेन्नीथला जी, नाना पटोले, बाळासाहेब थोरात सर्व नेत्यांनी या भावनेचा सन्मान केला आहे, असे नसीम खान यांच्याकडून सांगण्यात आले.

तर, गंभीर रूपाने सर्वांनी मला भरपाई देऊ असे सांगितले आहे. माझी जबाबदारी आहे जिथे चुकी होत असेल तिथे कुठलाही समाज पक्षापासून दूर जाणार असेल तर माझी भावना मांडली. सर्वांनी याची दखल घेतली त्याचा मी आभारी आहे. मी राजीनामा मागे घेत आहे. सर्व काँग्रेसचे नेते ज्यांनी राजीनामा दिला आहे, त्यांनी तो राजीनामा मागे घ्यावा. राहुल गांधी यांच्या लढ्यात सर्वांनी एकत्र यावे. संविधान बदलण्याचा जो कट आहे, त्यांना न्याय देण्यासाठी इंडिया आघाडीला समर्थन करायचे आहे, असेही यावेळी नसीम खान म्हणाले. त्यामुळे काँग्रेस पक्षश्रेष्ठींना लोकसभा निवडणुकीत आपल्या प्रमुख नेत्याची नाराजी दूर करण्यात मोठे यश मिळाले आहे.

हेही वाचा… Lok Sabha 2024 : उद्धव ठाकरेंचे ‘हे’ होते प्लॅनिंग; मुख्यमंत्री शिंदेंचा गौप्यस्फोट


Edited By : Poonam Khadtale

First Published on: May 6, 2024 6:20 PM
Exit mobile version