Lok Sabha 2024: शरद पवार-सुप्रिया सुळे भाजपात आले तर? फडणवीस म्हणाले, आत्याबाईला…

Lok Sabha 2024: शरद पवार-सुप्रिया सुळे भाजपात आले तर? फडणवीस म्हणाले, आत्याबाईला…

पुणे: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय वातावरण तापलं आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. या निवडणुकीत अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील प्रचार तोफा थंडावल्या आहेत. सध्या चौथ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरले जात आहेत. पुणे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी त्यांना शरद पवार, सुप्रिया सुळेंसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला,ज्यावर त्यांनी थेट उत्तर देणं टाळलं. (Lok Sabha Election 2024 Devendra Fadnavis not answered on Sharad Pawar and Supriya Sule question)

काय म्हणाले फडणवीस? (Fadnavis on Sharad Pawar) 

विधानसभेपूर्वी शरद पवार- सुप्रिया सुळे भाजपासोबत आल्यास तुमचे दरवाजे उघडे असतील का? असा प्रश्न फडणवीसांना विचारण्यात आला होता. त्या प्रश्नावर फडणवीसांनी उत्तर देणं टाळलं. राजकारणात जर-तरला काही अर्थ नसतो, त्या परिस्थितीनुसार निर्णय होत असतात. त्यामुळे जर-तरच्या प्रश्नावर मी उत्तर देत नसतो, असं फडणवीसांनी म्हटलं. तसंच, आत्याबाईला मिशा असत्या तर, त्यावर उत्तर द्यायचं नसतं, असंही फडणवीस यावेळी म्हणाले.

पुणे लोकसभेसाठी 25 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. पुण्यात महायुतीकडून मुरलीधर मोहोळ विरुद्ध महाविकास आघाडीकडून रविंद्र धंगेकर मैदानात आहेत. तर, वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मोरेही रिंगणात आहेत.

(हेही वाचा: Lok Sabha 2024 : सांगलीवर कसा काय हक्क सांगितला? विश्वजीत कदमांचा ठाकरेंना सवाल)


Edited By- Prajakta Parab

First Published on: April 25, 2024 3:44 PM
Exit mobile version