Lok Sabha 2024 : अजित पवारांना आणखी एक क्लीन चिट, आचारसंहिता भंग प्रकरणी दिलासा

Lok Sabha 2024 : अजित पवारांना आणखी एक क्लीन चिट, आचारसंहिता भंग प्रकरणी दिलासा

अजित पवारांना आणखी एक क्लीन चिट, आचारसंहिता भंग प्रकरणी दिलासा

मुंबई : काय लागेल को निधी द्यायला सहकार्य करू, पाहिजे तेवढा निधी देतो, पण मशीनमध्ये बटण दाबा कचाकचा, म्हणजे मलाही बरे वाटेल. नाही तर माझा हात आखडता होईल, असे वक्तव्य काही दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्याची निवडणूक आयोगाने गांभीर्याने दखल घेत या प्रकरणी तक्रार दाखल केली होती. या प्रकरणाचा निकाल आता आला असून निवडणूक आयोगाकडून अजित पवार यांना दिलासा देण्यात आला आहे. (Lok Sabha Election 2024 Election Commission clean chit to Ajit Pawar case of violation of code of conduct)

आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी बारामती लोकसभा मतदारसंघातील रिटर्निंग ऑफिसर यांनी अजित पवार यांनी क्लीन चिट दिली आहे. निवडणूक आयोगाने काल एक अहवाल पाठवला असून या अहवालात अजित पवार यांनी इंदापूर येथील सभेत केलेल्या वक्तव्यात आदर्श आचारसंहितेचा भंग नसल्याचे अहवालात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा व्हिडीओ पाहिला. या व्हिडीओत अजित पवार यांच्याकडून आचार संहितेचा भंग करण्यात आले असे काहीही आढळून आलेले नाही, अशी माहिती निवडणूक अधिकारी कविता द्विवेदी यांच्याकडून देण्यात आली आहे.

हेही वाचा… Lok Sabha 2024 : नारायण राणेंच्या भेटीवर गणपत कदम यांचे स्पष्टीकरण, म्हणाले…

तर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सभेतील व्हिडीओत पवार यांनी कोणत्याही पक्षाचे किंवा उमेदवाराला मते द्यायची याबाबतचा उल्लेख केलेला नाही. अजित पवार मतदारांना ईव्हीएमसाठी मतदान करण्यास सांगत असल्याचे ऐकले, उमेदवार किंवा पक्षाला मत द्या, असे ते म्हणालेले नाहीत यामुळे आचारसंहितेचे उल्लंघन होत नाही, असेही निवडणूक अधिकारी कविता द्विवेदी यांच्याकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

काय आहे प्रकरण?

काही दिवसांपूर्वी पुण्यातील एका सभेत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, आम्ही केलेल्या कामाचा तुम्हाला फायदा होईल, पण जेव्हा तुम्हाला फायदा होईल तेव्हा कोणामुळे फायदा झाला हे विसरू नका. विकासकामासाठी लागेल तेवढा निधी आम्ही देऊ. पण जस आम्ही पाहिजे तेवढा निधी देतो, त्याप्रमाणे मशीनमध्ये देखील कचाकचा बटण दाबा… म्हणजे मला निधी द्यायला बरे वाटेल. नाहीतर माझा हात आखडता येईल, असा इशारा त्यांच्याकडून मतदारांना देण्यात आला होता.

अजित पवारांचे क्लीन चिटचे दिवस…

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सध्या क्लीन चिट मिळण्याचे दिवस सुरू आहेत की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण दोनच दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या – शिखर बँक कथित घोटाळ्याप्रकरणी क्लीन चिट देण्यात आली होती. मुंबई आर्थिक गुन्हे शाखेकडून उपमुख्यमंत्री अजित पवार, त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना क्लीन चिट देण्यात आली. ऐन निवडणुकीच्या धामधुमीत आता अजित पवारांना त्यांच्यावर सुरू असलेल्या कारवायांमधून मुक्तता मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे.

हेही वाचा… Lok Sabha Election 2024 : देशात EVMवरच होणार मतदान; बॅलेट पेपर संदर्भातील याचिका SCने फेटाळल्या


Edited By : Poonam Khadtale

First Published on: April 26, 2024 3:56 PM
Exit mobile version