Lok Sabha 2024: मला लोखंडी रॉडने मारण्यात आलं; रामदास तडस यांच्या सुनेचे गंभीर आरोप

Lok Sabha 2024: मला लोखंडी रॉडने मारण्यात आलं; रामदास तडस यांच्या सुनेचे गंभीर आरोप

मला लोखंडी रॉडने मारण्यात आलं; रामदास तडस यांच्या सुनेचे गंभीर आरोप

मुंबई: तडस कुटुंबीयांकडून माझ्यावर अन्याय झाला. माझ्या चारित्र्यावर संशय घेतला गेला. तसंच, मला लोखंडी रॉडने मारण्यात आल्याचंही भाजपाचे खासदार रामदास तडस यांची सून पूजा तडस यांनी केला आहे. पूजा तडस यांनी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यासह पत्रकार परिषद घेत हे गंभीर आरोप केले आहेत. तसंच, त्यांनी यावेळी वर्ध्यातून अपक्ष लढणार असल्याचीही घोषणा केली आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे आरोप केले जात असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.  (Lok Sabha Election 2024 I was beaten with an iron rod BJP Ramdas Tadas daughter in law s serious allegations)

पूजा तडस यांनी वर्ध्यातून अपक्ष उमेदवारी जाहीर केल्याने, आता वर्ध्यात सासरा विरुद्ध सून अशी लढत पाहायला मिळणार आहे.

पूजा तडस काय म्हणाल्या?

रामदास तडस यांची सून पूजा तडस म्हणाल्या की, मला मुलं झालं त्यावेळी तडस परिवाराकडून बोलण्यात आलं की, हे बाळ कोणाचं? या बाळाची डीएनए टेस्ट करा, असे आरोप करण्यात आले. मला रॉडनंही मारण्यात आलं, मोदीजी 20 तारखेला वर्ध्यात सभेसाठी येणार आहेत. मी पंतप्रधान मोदींना एक विनंती करते की, माझ्या मुलाला न्याय द्या. मोदींनी सभेसाठी आल्यानंतर मला थोडा वेळ द्यावा आणि त्यांनी मला न्याय द्यावा.

लग्नानंतर मला एका फ्लॅटवर ठेवण्यात आलं. मला उपभोगाची वस्तू म्हणून वापरण्यात आलं. त्यातून बाळाचा जन्म झाला. खासदार आणि कुटुंबीय म्हणतात बाळाची डीएनए चाचणी कर. हे बाळ कोणाचं आहे? असा प्रश्नही मला करतात. खासदार तडस म्हणतात की, मी मुलाला बेदखल केलं आहे, पण त्यांनी मुलाला घरातून काढलेलं नाही. त्यांना त्यांचा मुलगा घरात राहिलेला चालतो मला एकटीलाच त्यांनी घराबाहेर काढलं आहे. माझ्याशी तडस कुटुंबीय राजकारण करत आहेत, असंही पूजा तडस यांनी म्हटलं आहे.

( हेही वाचा: Lok Sabha 2024: मुंबईतलं जागावाटप करताना विश्वासात घेतलं नाही; वर्षा गायकवाडांची नाराजी कायम)

First Published on: April 11, 2024 12:32 PM
Exit mobile version