Lok Sabha 2024 : वायकरांच्या प्रचाराला सोमय्यांना बोलवा, ठाकरे गटाचा खरमरीत टोला

Lok Sabha 2024 : वायकरांच्या प्रचाराला सोमय्यांना बोलवा, ठाकरे गटाचा खरमरीत टोला

वायकरांच्या प्रचाराला सोमय्यांना बोलवा, ठाकरे गटाचा खरमरीत टोला

मुंबई : शिवसेना शिंदे गटाचे नेते रवींद्र वायकर यांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. रवींद्र वायकर हे मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघाचे उमेदवार असून ते उद्या बुधवारी (ता. 01 मे) अर्ज भरण्याची शक्यता आहे. या लोकसभेतून महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे. त्यामुळे या मतदारसंघात आता शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट असा सामना रंगणार आहे. पण वायकरांना उमेदवारी जाहीर करून महायुतीने आमचा विजय सोपा केला असल्याचा टोला शिवसेना ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांनी लगावला आहे. (Lok Sabha Election 2024 Sachin Ahir criticism of Ravindra Waikar campaign by calling Kirit Somaiya)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून रवींद्र वायकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर उत्तर पश्चिम मतदारसंघातील राजकीय नेत्यांमध्ये फारसा उत्साह दिसून आलेला नाही. त्याचमुळे ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांनी टीका करत म्हटले आहे की, मी शिंदे गटाचे अभिनंदन करतो. तुम्ही आम्हाला ही निवडणूक सोपी करुन दिली. रवींद्र वायकर हे माझे चांगले मित्र आहेत. त्यांनी कुठल्या परिस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला हे आपल्या सर्वांना माहिती आहे. परंतु जोगेश्वरीमधून रवींद्र वायकर निवडून येत होते, तिथेच पहिले लीड आम्हाला मिळेल. ही निवडूक आम्हाला सोपी झाली आहे, असे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

हेही वाचा… Ravindra Waikar : रवींद्र वायकर यांना शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर

शिवसेना नेते रवींद्र वायकर शिंदे गटात जाण्याआधी त्यांच्यावर भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी आरोपांवर आरोप केले होते. पण आता त्याच किरीट सोमय्यांना वायकरांच्या प्रचाराला बोलवा, असा टोला अहिर यांनी लगावत म्हटले आहे की, वायकर यांच्या उमेदवारीला भाजपमधून विरोध होता, किरीट सोमय्या यांनीही त्यांच्याविरोधात आरोपांची राळ उठवली होती. किरीट सोमय्या यांनी आता स्टार प्रचारक म्हणून रवींद्र वायकर यांच्या प्रचाराला यावे. भाजपा सोडा पण अंतर्गत पक्षात उमेदवार मिळत नाही, म्हणून नाईलाजास्तवर वायकर यांना उमेदवारी दिली. मुंबईच्या सर्व जागांवर त्यांना उमेदवार बदलावा लागला, नवे उमेदवार द्यावे लागतात, इथेच आमचा विजय आहे, असा टोला आमदार सचिन अहिर यांनी लगावला आहे.

यावेळी आमदार सचिन अहिर प्रश्न उपस्थित करत म्हटले की, रवींद्र वायकर यांना उमेदवारी दिल्यानंतर मी काही प्रश्न उपस्थित करतो याची उत्तरे मिळावी. रवींद्र वायकर प्रचार करताना उद्धव ठाकरे यांच्याविरोधात बोलतील का? भाजपाचे किरीट सोमय्या स्टार प्रचारक म्हणून रवींद्र वायकर यांचा प्रचार करतील का? जर ते खासदारकीला पराभूत झाले तर त्यांना पुन्हा महापालिकेसाठी तयारी करावी लागणार का? असे खोचक प्रश्न यावेळी अहिर यांच्याकडून उपस्थित करण्यात आले. त्यामुळे सचिन अहिर यांच्या या प्रश्नाला आता महायुतीकडून नेमके काय उत्तर देण्यात येते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा… Lok Sabha 2024: भटकती आत्मा या टीकेवर अजित पवारांची सावध भूमिका; म्हणाले, पुढच्या सभेत मी मोदींनाच…


Edited By : Poonam Khadtale

First Published on: April 30, 2024 3:36 PM
Exit mobile version