Sangli Lok Sabha : अपक्ष अर्ज भरल्यानंतर विशाल पाटलांचं शक्तीप्रदर्शन; सांगलीचा वाद चिघळला

Sangli Lok Sabha : अपक्ष अर्ज भरल्यानंतर विशाल पाटलांचं शक्तीप्रदर्शन; सांगलीचा वाद चिघळला

सांगली : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला फक्त दोनच दिवस शिल्लक असतानाही महाविकास आघाडीत जागावाटपाचा तिढा कायम आहे. राज्यातील विरोधकांच्या महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला. पण या फॉर्म्युल्यावर मविआतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसने नाराजी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे सांगली लोकसभा मतदारसंघात काँग्रेसला मोठा बसण्याची शक्यता आहे. कारण सांगली लोकसभा मतदारसंघात शिवसेनेकडून (ठाकरे गट) चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पण काँग्रेसकडून विशाल पाटील हे इच्छूक असून आता विशाल पाटील अपक्ष निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे. (Lok Sabha Election 2024 Sangli Congress Vishal Patil Shiv Sena Candidate Chandrahar Patil)

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगली लोकसभा मतदारसंघात चंद्रहार पाटलांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे नाराज काँग्रेसचे नेते विशाल पाटल यांनी सांगली मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्याचबरोबत काँग्रेस पक्षाकडूनही दुसरा अर्ज दाखल करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत तिढा वाढण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर विशाल पाटील सांगलीत मोठं शक्तिप्रदर्शनही करणार असल्याची माहिती समोर येत आहे.

हेही वाचा – Lok Sabha 2024 : उडवाउडवीची उत्तरे नको, पीयूष गोयल यांना सचिन सावंतांनी सुनावले

दरम्यान, काँग्रेस नेते नागपूरकडे गेल्यावर विशाल पाटील यांनी निवडणूक कार्यालय गाठत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर आज काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तयारीत असल्याची महिती समोर येत आहे. मात्र, असे झाल्यास महाविकास आघाडीत तिढा वाढण्याची शक्यता आहे. एकिकडे विशाल पाटलांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला असताना, दुसरीकडे सांगली काँग्रेसचे कार्यकर्तेही नाराज आहेत. तसेच, पक्षश्रेष्टींकडे सांगलीतून विशाल पाटलांना उमेदवारी देण्याची मागणी करत आहेत. अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या रक्ताने विशाल पाटील यांना उमेदवारी मिळावी यासाठी पत्र लिहले. तसेच रक्ताने लिहलेले पत्र विशाल पाटील यांच्या कार्यालयाच्या समोर झळकवले.

एकिकडे विशाल पाटील यांनी अपक्ष अर्ज भरला असताना दुसरीकडे जाहीर उमेदवार चंद्रहार पाटील यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. “शेतकऱ्याच्या मुलगा खासदार होतोय हे दुखणं असेल तर काँग्रेसने तसं उघडपणे सांगावं”, असा टोला लगावत काँग्रेसवर निशाणा साधला.


हेही वाचा – Lok Sabha 2024 : …तर सांगेन आमचं ठरलंय जा, महायुतीच्या पुढाऱ्यांनी अपशकून करु नये; नारायण राणे आक्रमक

Edited By – Vaibhav Patil

First Published on: April 16, 2024 11:17 AM
Exit mobile version