Lok Sabha 2024 : घरातल्या मंगळसूत्राची प्रतिष्ठा ठेऊ शकत नाही त्यांनी…; संजय राऊतांचा पंतप्रधानांवर निशाणा

Lok Sabha 2024 : घरातल्या मंगळसूत्राची प्रतिष्ठा ठेऊ शकत नाही त्यांनी…; संजय राऊतांचा पंतप्रधानांवर निशाणा

मुंबई : नरेंद्र मोदी बायकांच्या मंगळसूत्रावर हात घालत आहेत, जो माणूस घरातल्या मंगळसूत्राची प्रतिष्ठा ठेऊ शकत नाही त्यांनी इतरांची उठाठेव करु नये, असं म्हणत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानमधील निवडणूक सभेत काँग्रेसवर निशाणा साधला होता. त्यात काँग्रेस आई-बहिणींचे मंगळसूत्र पण शिल्लक ठेवणार नाही, अशी टीका त्यांनी केली होती. पंतप्रधान मोदींच्या या वक्तव्यावर देशभरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. (Lok Sabha Election 2024 Sanjay Raut Slams PM Narendra Modi)

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नुकताच माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी संजय राऊत यांनी मंगळसूत्रावरून पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. “नरेंद्र मोदी बायकांच्या मंगळसूत्रावर हात घालत आहेत, जो माणूस घरातल्या मंगळसूत्राची प्रतिष्ठा ठेऊ शकत नही त्यांनी इतरांची उठाठेव करु नये. मणिपूरला किती महिलांची मंगळसूत्र गेली त्याला जवाबदार मोदी आहेत”, अशा शब्दांत संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला.

हेही वाचा – Lok Sabha 2024 : त्यांचा पराभव निश्चित, म्हणून…; फडणवीसांच्या टीकेला शरद पवारांचे चोख प्रत्युत्तर

याशिवाय राम मंदिरावरूनही संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. “अयोध्येत जेव्हा आंदोलन सुरु होत, तेव्हा हे डरपोक कुठे होते. राम मंदिराच्या मदतीने हे निवडणुका जिंकायला बघत आहेत. त्यांची शेवटची फडफड सुरु आहे. देशात हे आंदोलन असताना शिवसेना त्या आंदोलनात उतरली होती. अमित शहांच्या पक्षातील नेत्यांनी सांगितलं होत कि हे कृत्य शिवसेनेने केलं होते, तेव्हा बाळासाहेबांनी त्याची जवाबदारी घेतली होती. तेव्हा अमित शहा तरी होते का?”, असा सवाल उपस्थित करत संजय राऊत यांनी टीकास्त्र सोडले.

“साखर कारखान्यांना निवडणुकीच्या आधी दिलेला निधी म्हणजे लाच आहे. साखर कारखान्यांना लोकसभा निवडणुकीच्या अगोदरच कसा निधी देण्यात आला”, अशी टीका राऊतांनी केली. तसेच, आता कुठे आहे निवडणूक आयोग? असा सवालही संजय राऊतांनी उपस्थित केला.

शिवाय, “4 जूननंतर लोकसभा निवडणुकीचा निकाल हाती येईल. त्यानंतर एकनाथ शिंदे गट पूर्णपणे संपलेला असेल, त्यांचा एकही खासदार निवडून येत नाही, अजित पवार आणि एकनाथ शिंदे संपलेले असतील”, अशीही टीका यावेळी संजय राऊतांनी केली.


हेही वाचा – LOK SABAH 2024 : घरगुती गॅस आणि पेट्रोल-डिझेलच्या दरांबाबत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातून मोठं आश्वासन

Edited By – Vaibhav Patil

First Published on: April 25, 2024 11:21 AM
Exit mobile version