Lok Sabha Election 2024 Phase 2 : लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यात देशातील 13 राज्यातील 88 जागांवर मतदान

Lok Sabha Election 2024 Phase 2 : लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यात देशातील 13 राज्यातील 88 जागांवर मतदान

मुंबई : लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली असून, देशभरातील 13 राज्यातील 88 जागांवर आज (26 एप्रिल) मतदान होणार आहे. विशेष म्हणजे संपूर्ण देशातील जनतेचे लक्ष लागलेल्या वायनाड मतदारसंघातही आज मतदान होणार आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरोधात वायनाडमध्ये भाजपचे के. सुरेंद्रन आणि सीपीआयच्या अॅनी राजा या रिंगणात आहेत. (lok sabha election 2024 second phase voting updates in marathi)

दुसऱ्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील सर्व मतदान केंद्रांवर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. प्रत्येक मतदारसंघाचे वेब कास्टींग केले जात असून मतदानप्रक्रिया पूर्ण होईपर्यंत पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात आहे. आज देशाच्या महत्त्वाच्या मतदारसंघात मतदान पार पडतं आहे. या काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या वायनाड मतदारसंघातही मतदानाला सुरुवात झाली आहे. शिवाय, मथुरेतून हेमामालिनी, कोटा बुंदी या राजस्थानातल्या मतदारसंघातून मावळते लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, राजनांदगावमधून भुपेश बघेल, तिरूअनंतपुरममधून शशी थरूर, दक्षिण बंगळुरूतून भाजपचे तेजस्वी सूर्या, मेरठमधून भाजपचे अरूण गोविल यांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद होणार आहे.

हेही वाचा – Live Update Lok Sabha 2024 Phase 2 : इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांनी बेंगळुरू मतदानाचा हक्क बजावला

केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर तिरुअनंतपुरममधून निवडणूक लढवत आहेत. येथे त्यांची स्पर्धा काँग्रेस नेते शशी थरूर यांच्याशी आहे. जम्मू लोकसभा जागेवर भाजपचे जुगल किशोर आणि काँग्रेसचे रमण भल्ला आहेत. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या 8 मतदारसंघातही आज मतदान पार पडत आहे. यामध्ये विदर्भातील मतदारसंघांचा समावेश आहे. त्यानुसार, महाराष्ट्रातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ तर मराठवाड्यातले हिंगोली, नांदेड, परभणी या मतदारसंघात मतदान सुरू आहे.

दुसऱ्या टप्प्यात केरळमधील सर्व 20, कर्नाटकातील 14, राजस्थानमधील 13, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमधील प्रत्येकी 8, मध्य प्रदेशातील 6, आसाम आणि बिहारमधील प्रत्येकी 5, छत्तीसगड आणि पश्चिम बंगालमधील प्रत्येकी 3 आणि जम्मू-काश्मीर आणि त्रिपुरामधील 1 जागेचा समावेश आहे. याशिवाय मणिपूरचा 1 भाग म्हणजे मणिपूर बाह्य सीट. लोकसभा मतदारसंघासाठी सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होणार आहे. मात्र सकाळी 6 वाजता मॉक पोलला सुरुवात झाली. ईव्हीएम व्यवस्थित काम करतंय की नाही हे यातून तपासण्यात आले. दरम्यान मतदान केंद्र अधिकारी आणि सर्वच यंत्रणा सज्ज आहे.

लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदान

लोकसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्याचे मतदान 19 एप्रिल रोजी झाले. देशभरातील 102 मतदारसंघात पहिल्या टप्प्यातील मतदान झाले. तर महाराष्ट्रातील पाच लोकसभा मतदारसंघात पहिल्या टप्प्यात मतदान झाले. यामध्ये विदर्भातील रामटेक लोकसभा मतदारसंघ, नागपूर लोकसभा मतदारसंघ, भंडारा- गोंदिया, गडचिरोली- चिमूर आणि चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ या पाच लोकसभा मतदारसंघाचा समावेश होता.


हेही वाचा – Lok Sabha 2024 : आठ लोकसभा मतदारसंघात आज मतदान; दिग्गज उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला

Edited By – Vaibhav Patil

First Published on: April 26, 2024 8:05 AM
Exit mobile version