Lok Sabha 2024 : कोण एकनाथ शिंदे? उद्याच्या निवडणुकीनंतर अस्तित्व संपलेले असेल – संजय राऊत

Lok Sabha 2024 : कोण एकनाथ शिंदे? उद्याच्या निवडणुकीनंतर अस्तित्व संपलेले असेल – संजय राऊत

जळगाव : राज्यात महायुतीचे माहोल सुरू आहे. उद्धव ठाकरेचे संतुलन पूर्णपणे बिघडले आहे, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याव केली. मुख्यमंत्री शिंदेंच्या टीकेनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंना प्रत्युत्तर दिले आहे. ‘संतलून कोणाचं बिघडलं आणि कोणचं काय झालं हे चार जूननंतर कळेल’, अशा शब्दांत संजय राऊतांनी टीका केली. (Lok Sabha Election 2024 Shiv sena thackeray group mp sanjay raut slams cm eknath shinde)

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जळगावात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी कोण एकनाथ शिंदे? असा सवाल उपस्थित करत संजय राऊतांनी टीका केली. “उद्याची निवडणूक झाली की, महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे यांचे असलेले अस्तित्व संपलेले असेल. संतलून कोणाचं बिघडलं आणि कोणचं काय झालं हे चार जूननंतर कळेल”, अशा शब्दांत संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंवर टीका केली.

हेही वाचा – Lok Sabha 2024 : मोदी हे खोटं बोलणारे नेते, 4 जूननंतर पंतप्रधान राहणार नाहीत; संजय राऊतांची टीका

नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?

“पूर्णपणे संतुलन बिघडलेले आहे. आम्ही जे काम करत आहोत. त्या कामाला लोकं खूप चांगला प्रतिसाद देत आहेत. या राज्यात महायुतीचा माहोल सुरू असून विकासाची काम सुरू आहेत. राज्यातील आणि दिल्लीतील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामामुळे ते (उद्धव ठाकरे) वैफल्यग्रस्त झाले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून दुसरी काय अपेक्षा करणार आपण? मी प्रत्येकाला कामाने उत्तर देतो”, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.


हेही वाचा – Lok Sabha 2024 : यांच्यावर विश्वास कसा ठेवायचा? पवारांचा पंतप्रधानांवर हल्ला

Edited By – Vaibhav Patil

First Published on: April 24, 2024 2:21 PM
Exit mobile version