Live Update: उत्तराखंडमध्ये जंगलाला भीषण आग; वणव्यांमुळे ३३.३४ हेक्टरवरील झाडे जळून खाक

Live Update: उत्तराखंडमध्ये जंगलाला भीषण आग; वणव्यांमुळे ३३.३४ हेक्टरवरील झाडे जळून खाक

Live Update

उत्तराखंडमध्ये जंगलाला भीषण आग; वणव्यांमुळे ३३.३४ हेक्टरवरील झाडे जळून खाक

28/4/2024 21:7:39


राजकारणातील IPL म्हणजे इंडियन पॉलिटीकल लीग – उद्धव ठाकरे

28/4/2024 20:28:5


विनायक राऊतांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे रत्नागिरीत दाखल

28/4/2024 19:54:34


प्रज्वल रेवन्ना यांच्या सेक्स स्कँडलच्या चौकशीसाठी SIT ची स्थापना

28/4/2024 17:48:58


शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक एम. के. मढवी यांना खंडणीविरोधी पथकाकडून अटक

शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक एम. के. मढवी आणि त्यांचे चालक अनिल मोरे यांना खंडणीविरोधी पथकाकडून अटक

दोघांनाही न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली

28/4/2024 17:46:21


लहान मुलांची विक्री करणाऱ्या सात जणांना अटक

लहान मुलांची विक्री करणाऱ्या टोळीला मुंबई पोलिसांकडून अटक

मुंबईतील रुग्णालय पोलिसांच्या रडारवर

28/4/2024 14:8:48


अभिनेता साहिल खानला 1 मे पर्यंत पोलीस कोठडी


महादेव बेटिंग ॲप प्रकरणी अभिनेता साहिल खानला अटक

अभिनेता साहिल खानबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. महादेव बेटिंग ॲप प्रकरणात मुंबई पोलिसांच्या एसआयटीने त्याला ताब्यात घेतले आहे. खान द लायन बुक ॲप नावाच्या बेटिंग ॲपशी जोडला गेला होता, जो महादेव बेटिंग ॲप नेटवर्कचा देखील भाग आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या एसआयटीने यापूर्वी त्याची चौकशी केली होती. या अभिनेत्याने जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली होती, मात्र त्याचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता.

28/4/2024 10:31:12


ओबीसी नेते प्रकाश शेंडगेच्या गाडीवर अज्ञातांनी शाईफेक केली. तसंच, चपलांचा हार घातला.

मराठा समाज तुम्हाला पाडल्याशिवाय गप्प बसणार नाही, अशा आशयाचा पोस्टर त्यांच्या गाडीवर लावण्यात आला.

28/4/2024 8:54:15


उज्वल निकम मुंबा देवीच्या दर्शनाला

भाजपाने उमेदवारी जाहीर केल्यानंतर, वकील उज्वल निकम यांनी मुंबा देवीचं दर्शन घेतलं आहे.

28/4/2024 8:34:10


उद्धव ठाकरे यांची आज कोकणात सभा

उद्धव ठाकरे यांची आज कोकणात सभा आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यात 6 सभा घेणार

कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदार महायुतीच्या उमेदवारांकरता येत्या 10 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचार सभा होणार आहे. देशात लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी ठिकठिकाणी पंतप्रधान मोदी यांचा झंझावात प्रचार सुरू आहे.

First Published on: April 28, 2024 8:29 AM
Exit mobile version