Lok Sabha 2024 : नितीन गडकरींची नागपूरची जागा धोक्यात, काँग्रेस नेते वडेट्टीवारांचा दावा

Lok Sabha 2024 : नितीन गडकरींची नागपूरची जागा धोक्यात, काँग्रेस नेते वडेट्टीवारांचा दावा

नितीन गडकरी यांची नागपूरची जागा धोक्यात, काँग्रेस नेते वडेट्टीवारांचा दावा

नागपूर : राज्यात लोकसभा निवडणुकीचे जोरदार वारे वाहत असून तीन टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडणे बाकी आहे. नागपूर लोकसभा मतदारसंघाची मतदान प्रक्रिया पहिल्या टप्प्यात म्हणजे 19 एप्रिल रोजी पार पडली. या लोकसभेतून भाजपा नेते, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्यात आले. पण त्यांची ही जागा धोक्यात असल्याचे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्याकडून सांगण्यात आले आहे. वडेट्टीवार हे विधानसभेचे विरोधी पक्षनेते असून ते पक्षाचे स्टार प्रचारक देखील आहेत. मविआचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांच्या प्रचारार्थ घेतलेल्या सभेत वडेट्टीवार यांनी हे मत व्यक्त केले आहे. (Lok Sabha Election 2024 Vijay Wadettiwar claims that Nitin Gadkari Nagpur seat is in danger)

यावेळी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, भाजपाच्या बाबतीत लोकांमध्ये प्रचंड संताप आहे. यामुळं महाविकास आघाडी राज्यामध्ये 38 पेक्षा जास्त जागा जिंकेल. त्यामुळे नितीन गडकरी यांची नागपूरची जागा सुद्धा धोक्यात आली आहे, असा टोला वडेट्टीवारांनी लगावला आहे. तर, पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात जागा कमी येतील असा सांगणारा भाजपा शेवटच्या टप्प्यापर्यंत दोनशेच्या आत येईल आणि देशाचे चित्र बदलेल, असे वडेट्टीवार म्हणाले. विदर्भातील दहाही जागा या भाजपाच्या हातातून जातील असा दावा यावेळी विजय वडेट्टीवार यांच्याकडून करण्यात आला आहे.

हेही वाचा… Lok Sabha 2024 : ही आकडेमोड कोणत्या शहाण्याने केली? ठाकरे गटाची निवडणूक आयोगावर टीका

तसेच, भाजपाचे नेते नितीन गडकरी हे नागपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. पहिल्या टप्प्यातच या मतदारसंघासाठी मतदान झाले आहे. मात्र, या मतदारसंघातून नितीन गडकरी निवडून येणार नाहीत, असा दावा करत वडेट्टीवार यांनी केल्याने आता त्यांच्या या विधानावर आता भाजपाच्या नेत्यांकडून काय उत्तर देण्यात येते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे 4 जूनला कोणाचा काय निकाल लागत आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

या प्रचार सभेत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडतर यांच्याबाबतही विधान केले. या संदर्भात ते म्हणाले की, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीशी आमची चर्चा झाली होती. पण शेवटच्या टप्प्यात विषय मार्गी लागला नाही. जागा वाटपातून निर्णय झाला नाही. ते आज अनेक कारणे सांगत आहेत, त्यात फार काही तथ्य नाही, असा पलटवार त्यांनी आंबेडकरांच्या टीकेला केला आहे.

हेही वाचा… Lok Sabha 2024 : …अन्यथा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करेन, त्या कलाकाराचा चित्रा वाघांना इशारा


Edited By : Poonam Khadtale

First Published on: May 3, 2024 3:33 PM
Exit mobile version