Lok Sabha 2024 : आवाहन करूनही मतदानाची टक्केवारी वाढेना, नेत्यांना चिंता

Lok Sabha 2024 : आवाहन करूनही मतदानाची टक्केवारी वाढेना, नेत्यांना चिंता

नांदेड : राज्यातील आठ आणि देशभरातील 88 जागांवर दुसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया आज शुक्रवारी (ता. 26 एप्रिल) पार पडत आहे. पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रात म्हणावे तितके चांगले मतदान झाले नाही. उन्हाची वाढत असलेली तीव्रता हे मतदानाची टक्केवारी कमी होण्याचे प्रमुख कारण असले तरी बहुतांश मतदारांनी राजकारणाला कंटाळून मतदानाला बाहेर न पडत असल्याचेच पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता नेत्यांची चिंता वाढली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक नेत्यांनी मतदारांना आवाहन करूनही मतदानाचा टक्का वाढत नसल्याचेच पाहायला मिळत आहे. (Lok Sabha Election 2024 Worry among leaders as voter turnout declines)

देशात दुसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली असून नांदेडमधील भाजपाचे नेते अशोक चव्हाण यांनी आपल्या कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. भाजपात गेल्यानंतर अशोक चव्हाण यांची पहिलीच निवडणूक आहे. त्यामुळे त्यांनी सर्व मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. दुपारी 01 वाजेनंतर उन्हाची तीव्रता वाढते, त्यामुळे मतदारांनी सकाळीच येऊन लवकर मतदान करावे, असे आवाहन अशोक चव्हाण यांच्याकडून करण्यात आले आहे.

हेही वाचा… Lok Sabha 2024 : परभणीतील बलसा खुर्द गावाचा मतदानावर बहिष्कार; अतिक्रमणामुळे मतदार नाराज

तर, तुम्हाला ज्याला मतदान करायचे आहे, त्यांना तुम्ही मतदान करा, पण कराच. दर पाच वर्षांनी लोकशाही बळकट करण्यासाठी हे मतदान घेण्यात येत असते, त्यामुळे लोकांना मतदान करण्याचे आवाहन करत भाजपाचे राज्यसभेचे खासदार अशोक चव्हाण यांनी आपल्या कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला, यावेळी त्यांनी मतदारांना मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन केले आहे. पण त्यांच्या या आवाहनाला फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचेच पाहायला मिळत आहे. नांदेडमध्ये सकाळी 11 वाजेपर्यंत 20 टक्के मतदान झाले आहे. ज्यामुळे आता उन्हाची तीव्रता वाढल्यानंतर किती मतदार घराच्या बाहेर पडून मतदान करतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

लोकसभा निवडणूक 2024 च्या पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील मतदानाची टक्केवारी घसरल्याचे पाहायला मिळाले आहे. ज्यामुळे उर्वरित चार टप्प्यांमध्ये तरी मतदानाची टक्केवारी वाढावी, अशी आशा नेतेमंडळींकडून व्यक्त करण्यात येत आहे. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेकॉर्डब्रेक मतदान करण्याचे आवाहन केले आहे. पण महाराष्ट्रात 11 वाजेपर्यंत केवळ 18.83 टक्के मतदान झालेले आहे. ज्यामुळे राजकीय नेत्यांची चिंता वाढली आहे. दुसऱ्या टप्प्यात तर 8 मतदारसंघामधील अनेक गावांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकल्याचे पाहायला मिळत आहे. समस्यांनी त्रस्त मतदारांनी मतदानावर बहिष्कार टाकल्याने मतदानाची टक्केवारी घसरली आहे.

हेही वाचा… Lok Sabha 2024 : राज्यातील अनेक मतदान केंद्रातील EVM मध्ये बिघाड; 39 बॅलेट मशीन तर 16 कंट्रोल युनिट बदलले


Edited By : Poonam Khadtale

First Published on: April 26, 2024 12:17 PM
Exit mobile version