तळोजातील केमिकल कंपन्यांवर वायू प्रदूषण नियंत्रकाची नजर; लोकायुक्तांचे आदेश

तळोजातील केमिकल कंपन्यांवर वायू प्रदूषण नियंत्रकाची नजर; लोकायुक्तांचे आदेश

मुंबईः तळोजामध्ये वायू प्रदुषण करणाऱ्या कंपन्यांवर वायू प्रदुषण नियंत्रक बसवण्याचे निर्देश महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने द्यावेत, असे आदेश लोकायुक्त व्ही. एम. कानडे यांनी दिले आहेत.

लोकायुक्त कानडे म्हणाले, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व पर्यावरण विभागाने तळोजामध्ये वायू प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांचा शोध घ्यावा. हे प्रदुषण करणाऱ्यांना कारणे नोटीस देऊन त्यांच्यावर कारवाई करावी. तळोजा परिसरात वायू प्रदूषण होऊ नये यासाठी ठोस उपाय योजना कराव्यात. त्याचा अहवाल तीन आठवड्यात सादर करावा.

तळोजातील वायू प्रदूषण रोखण्यासाठी विशेष तज्ज्ञांची समिती स्थापन करावी. या समितीमध्ये एक पोलीस अधिकारी असावा, एक सनदी अधिकारी असावा व एक पर्यावरण तज्ज्ञ असावा, असेही लोकायुक्त कानडे यांनी आदेशात नमूद केले आहे.

तळोजा येथील उत्पादक संघटनेनेही याप्रकरणी प्रत्युत्तर सादर करावे. तळोजा परिसरातील वायू व जल प्रदूषण रोखण्यासाठी काय करता येईल याचा खुलासा उत्पादक संघटनेने प्रत्युत्तरात करावा, असेही लोकायुक्त यांनी सांगितले आहे.

याप्रकरणी राजीव सिन्हा, सुनिल पाटील, समीर पाटील यांनी लोकायुक्त यांच्याकडे अर्ज केला आहे. तळोजा परिसरातील केमिकल कंपन्यांमधून रात्रीच्या वेळेस obnoxious gases सोडला जातो. याने वायू प्रदूषण होते. या परिसरात डम्पिंग ग्राऊंड आहे. तेथे कचरा जाळला जातो. त्यामुळेही वायू प्रदुषण होते. वायू प्रदूषणामुळे श्वसनास त्रास होतो, असा दावा अर्जात करण्यात आला आहे.

या अर्जावर लोकायुक्त कानडे यांच्यासमोर सुनावणी झाली. अरविंद म्हात्रे यांनी राष्ट्रीय हरित लवादासमोर अशाच प्रकारचा अर्ज केला होता. नदीपात्र सोडले जाणाऱ्या केमिकलयुक्त पाण्यामुळे जल प्रदुषण होत होते. राष्ट्रीय हरित लवादाने केमिकलयुक्त पाण्यावर प्रक्रिया करण्याचे आदेश दिले. त्यानुसार  जल प्रदुषण कमी झाले. तेथे वायु प्रदुषणाचा मुद्दा उपस्थित केला गेला नाही, असे लोकायुक्त कानडे यांच्या निदर्शनास आले.

मेसेर्स मुंबई वेस्ट मॅनेजमेंट. मेसेर्स लासन्स् इंडिया प्रा. लि. व ग्लोबल मरिन एक्सपोर्य कंपन्यांतून रात्रीच्यावेळी सोडल्या जाणाऱ्या obnoxious gases मुळे तळोजामध्ये मोठ्या प्रमाणात वायू प्रदुषण होते. नागरिकांना श्वसनाला त्रास होतो. यावर प्रतिबंध घालणे महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळालाही जमणार नाही. त्यामुळे याला कोण जबाबदार आहे असाही प्रश्न उपस्थित करण्यत आला.

तळोजातील वायू प्रदुषण नियंत्रणात आणण्यासाठी आयआयटी मुंबईची मदत घेतली आहे. त्यांनी या संपूर्ण परिस्थितीचा अभ्यास केला आहे. लवकरच ते यावरील उपाय योजनेचा अहवाल सादर करतील. या अहवालाची अमंलबजावणी तत्काळ केली जाईल, असे प्रदुषण नियंत्रण मंडळाच्यावतीने adv अभय पत्की यांनी लोकायुक्त कानडे यांंना सांगितले.

मात्र तळोजा परिसरात रात्रीच्या वेळी केमिकल कंपन्यांमधून सोडल्या जाणाऱ्या obnoxious gases ची तपासणी करण्यासाठी विशेष तज्ज्ञांची समिती नेमणे आवश्यक आहे. या समितीने obnoxious gases सोडण्याला कोण जबाबदार हेही शोधून काढायला हवे, असे मत लोकायुक्त व्ही. एम. कानडे यांनी व्यक्त केले.

 

First Published on: February 21, 2023 10:55 AM
Exit mobile version