Loksabha 2024: संभाजीनगरमध्ये मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी; कारण आलं समोर

Loksabha 2024: संभाजीनगरमध्ये मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी; कारण आलं समोर

संभाजीनगरमध्ये मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी; कारण आलं समोर

छत्रपती संभाजीनगर: लोकसभा उमेदवार ठरवण्यासाठी मराठा समाजाची बैठक छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आली होती. मराठा मंदिरमध्ये ही बैठक सुरू होती. परंतु या बैठकीदरम्यान वाद झाला. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आणि हाणामारीला सुरुवात झाली. यात काही कार्यकर्त्यांनी विशिष्ट उमेदवारांकडून पैसे घेऊन बैठक आयोजित केल्याचा आरोप केला. (Loksabha 2024 Clashes at Maratha community meeting in Sambhaji nagar The reason came to the fore)

हा आरोप झाल्यानंतर विकी पाटील या तरुणाला बेदम मारहाण करायला जमावाने सुरूवात केली. बाळू औताडे या तरुणाने सुरुवातीला मारहाण केली. त्यानंतर इतरही तरुणांनी मारहाण करायला सुरूवात केली. त्यानंतर संपूर्ण बैठकीत मोठा राडा झाल्याचा पाहायला मिळाला.

वादाचं कारण काय?

सध्या पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर वातावरण शांत आहे. कोणी कोणाचं नाव घेऊन बोलायचं नाही, असं ठरलेलं. पण तरीही काही नाव घेण्यात आली. त्यावरून ही सर्व हाणामारी झाल्याचं सांगण्यात आलं. तसंच, जर या बैठकीत काही मतभेद झाले तर मनोज जरांगे पाटील यांच्याकडे जायचं ठरलेलं होतं. असं ठरलेलं असतानाही काही नाव घेण्यात आली आणि त्यामुळे वाद निर्माण झाला आणि हाणामारी झाली.

(हेही वाचा: Loksabha 2024: संभाजीनगरमध्ये मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी; कारण आलं समोर )

First Published on: March 29, 2024 2:56 PM
Exit mobile version