मुंबई विद्यापीठाचे १४० कोटी बुडाले

मुंबई विद्यापीठाचे १४० कोटी बुडाले

मुंबई विद्यापीठाला नॅककडून अ++ श्रेणीचा दर्जा बहाल

रिझर्व्ह बँकेने येस बँकेवर घातलेल्या निर्बंधांनंतर आता मोठी माहिती समोर येत आहेत. आज मुंबई विद्यापीठाची सिनेट बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत बुडीत गेलेल्या येस बँकेत मुंबई विद्यापीठाच्या १४० कोटींच्या ठेवी असल्याची बाब विद्यापीठाच्या उघडकीस आली आहे. यावर कुलगुरुंना उत्तर देता न आल्याने सभा तहकूब करावी लागली.


हेही वाचा – अमेरिकेनेच वुहानमध्ये करोना पसरवला- चीनचा गंभीर आरोप


दरम्यान, या बैठकीत सिनेट सदस्य सुप्रिया करंडे यांनी हा मुद्दा उपस्थित केला. यावर कुलगुरूंना सविस्तर उत्तर देता न आल्याने सदस्यांनी सभा तहकूब केली. जानेवारी २०२० मध्ये ही गुंणतवणूक केली गेली आहे. महाविद्यालयांना नॅशनल शेड्यूल्ड बँकेत खाते नसेल तर त्यांची संलग्नता रद्द करण्यात येते. असे असताना विद्यापीठाने खासगी बँकेत कसे पैसे ठेवले, असा प्रश्न सदस्यांकडून उपस्थित करण्यात आला. विद्यापीठाच्या बजेटमध्ये ठेवींबाबत कोणतीही माहिती सदस्यांना देण्यात येत नाही. हा एक घोटाळा असून यासंदर्भात पोलीस तक्रार करण्याची सदस्यांची मागणी आहे.

 

First Published on: March 13, 2020 2:12 PM
Exit mobile version