महाड अक्कलकोट एसटी बस आंबेनळी घाटात कोसळली; १५ प्रवासी जखमी

महाड अक्कलकोट एसटी बस आंबेनळी घाटात कोसळली; १५ प्रवासी जखमी

प्रातिनिधीक फोटो

महाबळेश्वरच्या हद्दीत एसटी बसला अपघात झाल्याची घटना घडली आहे. महाड येथून अक्कलकोटला जाणारी एसटी बस आंबेनळी घाटात कोसळली आहे. या दुर्घटनेत १५ प्रवासी जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि प्रवाशांचा जीव वाचवला आहे. महाड येथून अक्कलकोटला जाणारी ही एसटी बस महाडला मुक्कामी असते. प्रतापगडपासून पोलादपूरला जाणाऱ्या घाटातून ही बस खाली गेली. सुदैवाने खाली कोसळलेली बस घाटातील झाडांमध्ये अडकली. दरम्यान या अपघातातील १५ जखमी प्रवाशांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. स्थानिक रुग्णालयात जखमी प्रवाशांवर उपचार सुरु आहेत.

First Published on: October 30, 2019 10:00 PM
Exit mobile version