जानकर, शेट्टी, तुपकर यांच्यात हातकणंगलेच्या जागेवरून तासभर चर्चा

जानकर, शेट्टी, तुपकर यांच्यात हातकणंगलेच्या जागेवरून तासभर चर्चा

महादेव जानकर, राजू शेट्टी यांची बैठक

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार राजू शेट्टी, रासप अध्यक्ष व राज्याचे दुग्धविकासमंत्री महादेव जानकर, प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांची पुणे येथे बैठक पार पडली. लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीबाबत त्यांच्याच तब्बल एक तास चर्चा झाली. युतीमधील हे घटकपक्ष निवडणुकीतील त्यांच्या जागावाटपावरून सत्ताधाऱ्यांवर नाराज असून त्यांनी आपापसात चर्चा करून तिढा सोडवण्याचा प्रयत्न केल्याचे या बैठकीतून समोर येत आहे. एकीकडे काँग्रेस हे शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना हातकणंगले मतरदारसंघातून उमेदवारी देण्यास इच्छुक असून दुसरीकडे भाजपदेखील यात जागेवरून महादेव जानकर यांना उमेदवारी देणार असल्याचे बोलले जात आहे. एकाच जागेवरून दोघांमध्ये तिढा निर्माण होण्याची शक्यता असतानाच, शेट्टी आणि जानकर यांनी आपापसात चर्चा करून यावर तोडगा काढण्याच्या प्रयत्नात असल्याचे या चर्चेतून जाणवते.

First Published on: March 12, 2019 1:13 PM
Exit mobile version