‘महावितरण’मध्ये नोकरीची संधी; १५ फेब्रुवारीच्या आत करा अर्ज

‘महावितरण’मध्ये नोकरीची संधी; १५ फेब्रुवारीच्या आत करा अर्ज

महावितरणमध्ये नोकरीची संधी

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात नोकरी करण्यासाठी इच्छुक असाल आणि तुम्ही आदिवासी प्रवर्गात मोडत असाल तर तुमच्यासाठी सुवर्ण संधी चालून आली आहे. विद्युत सहायक पदांसाठी कंपनीने भरती सुरु केली आहे. MAHADISCOM द्वारे एकूण ८२ पदासांठी जाहीरात काढण्यात आली असून १५ फेब्रुवारींपर्यंत उमेदवारांना अर्ज पाठवता येणार आहेत.

पदाचे नाव आणि संख्या

विद्युत सहाय्यक            | पदांची संख्या – ३७

उपकेंद्र सहाय्यक            | पदांची संख्या – १९

पदवीधर इंजिनिअर ट्रेनी     | पदांची संख्या – ०२

डिप्लोमा इंजिनिअर ट्रेन     | पदांची संख्या – १०

ज्यु. असिस्टंट अकाऊंट     | पदांची संख्या – ०८

ज्यु. असिस्टंट एचआर       | पदांची संख्या – ०६

अर्जाची मुदत

अर्ज पाठविणे – ४ फेब्रुवारी २०२०

शेवटची तारिख – १५ फेब्रुवारी २०२०

शैक्षणिक पात्रता

उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थेतून बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही जाहीरातीचे नोटीफिकेशन तपासू शकता.

वयोमर्यादा काय आहे?

MAHADISCOM नियमानुसार उमेदवाराचे वय कमीतकमी १८ तर जास्तीत जास्त २७ पर्यंत असावे.

अर्जाची प्रक्रिया काय आहे?

इच्छूक उमेदवारांनी MAHADISCOM चे अधिकृत संकेतस्थळ https://www.mahadiscom.in/news-latest-announcements वर जाऊन जाहीरात तपासू शकता. संकेतस्थळावर जाऊन भरतीची प्रक्रिया, परिक्षा आणि इतर माहितीसाठी जाहीरात नक्की वाचा…

महावितरण बद्दल थोडक्यात माहिती

महाराष्ट्रात मुंबई वगळता राज्यातील वीज निर्मिती, पारेषण व वितरण करण्याचे काम २००५ पूर्वी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाकडे होते. २००३ मध्ये विद्युत अधिनियम अस्तित्वात आल्यानंतर राज्य विद्युत मंडळाची पुनर्रचना होऊन दि. ०६ जून २००५ रोजी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित (महावितरण), महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित (महानिर्मिती) व महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित (महापारेषण) या तीन कंपन्या अस्तित्वात आल्या. यापौकी राज्यभरातील ग्राहकांपर्यंत वीज पोहचविण्याचे काम महावितरण कंपनीकडून केले जाते.

First Published on: February 5, 2020 8:23 PM
Exit mobile version