मजुरांना घेऊन जाणाऱ्या एसटीला अपघात, ४ जणांचा मृत्यू तर १५ जखमी!

मजुरांना घेऊन जाणाऱ्या एसटीला अपघात, ४ जणांचा मृत्यू तर १५ जखमी!

मजुरांना घेऊन जाणाऱ्या एसटीला अपघात

सोलापूरवरून झारखंडला निघालेल्या एसटीचा अपघात झालेला आहे. एसटीतून मजूर आपल्या गावी निघाले होते यावेळी हा अपघात झाला. यवतळमाळमध्ये एसटी आणि टँकरची धडक झाली आणि अपघात घडला. या अपघातात बसमधील ४ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात एसटीचालकाचा समावेश आहे. तर १५ जण जखमी आहेत.

यवतमाळमध्ये आर्णीजवळच्या कोळवण गावाजवळ ही घटना घडली. जखमींना आर्णी आणि यवतमाळमधील शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींवर सध्या उपचार सुरू आहेत. मृतांमध्ये बसचालक, दोन महिला आणि दोन पुरूषांचा समावेश आहे.

तर काल उत्तर प्रदेशमधील महोबा जिल्ह्यात आपल्या मुळ घरी जात असलेल्या मजुरांच्या ट्रकचा अपघात झाला होता. या अपघातात तीन महिलांचा मृत्यू झाला असून बाराहून अधिक लोक जखमी झाले आहेत. पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. बचाव कार्य युद्धपातळीवर सुरु आहे. पानवाडी पोलीस स्टेशन परिसरातील झाशी-मिर्झापूर महामार्गाच्या महुआ वळणावर हा अपघात झाला.

यापूर्वी शनिवारी औरैया जिल्ह्यात एक धक्कादायक अपघात झाला होता. या अपघातात सुमारे २५ स्थलांतरित कामगार ठार झाले आणि ३० हून अधिक लोक जखमी झाले.


हे ही वाचा – भिकारी असणाऱ्या राजूने १०० कुटुंबांना वाटले रेशन आणि ३ हजार मास्क!


 

First Published on: May 19, 2020 9:03 AM
Exit mobile version