Live Update : मु्ंबई विमानतळावर साडेसात किलो हेरॉईन जप्त

Live Update : मु्ंबई विमानतळावर साडेसात किलो हेरॉईन जप्त

Live update Mumbai Maharashtra

मु्ंबई विमानतळावर साडेसात किलो हेरॉईन जप्त. त्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत ५३ कोटी रुपये आहे.


हक्कभंग नोटीसला उत्तर देण्यासाठी संजय राऊतांना मुदतवाढ


महाविकास आघाडीकडून राज्यभर घेण्यात येणार सभा

एप्रिल आणि मे महिण्यात राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात मविआ एकत्र सभा घेणार

प्रामुख्याने नागपूर, पुणे आणि कोल्हापूर येथे घेण्यात येणार सभा

उद्धव ठाकरे, अजित पवार आणि नाना पटोले राहणार सभांना उपस्थित

२ एप्रिलला मविआची पहिली सभा होणार


संजय राऊत यांनी हक्कभंग प्रकरणी भूमिका मांडण्यासाठी केली वेळेची मागणी

संजय राऊतांचे विधिमंडळाला पत्र

सभागृहाचा अवमान करण्याचा माझा कुठलाही हेतू नव्हता. मी केलेले वक्तव्य हे विधिमंडळातील त्या एका गटासाठी केले होते. भूमिका स्पष्ट करण्यासाठी एका आठवड्याची मुदत देण्यात यावी : संजय राऊत


महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमाला शरद पवारांची हजेरी

जागतिक महिला दिनानिमित्त जागर स्त्रीत्वाचा सन्मान कर्तृत्वाचा कार्यक्रमाचे आयोजन


आमदार बच्चू कडू यांना २ वर्षांची शिक्षा

दिव्यांगांच्या मागण्यांसाठी २०१७ मध्ये केले होते आंदोलन

नाशिक सत्र न्यायालयाने ठोठावली शिक्षा


प्रदीप शर्माच्या न्यायालयीन कोठडीत वाढ

मनसुख हिरेन प्रकरणाची पुढील सुनावणी २३ मार्चला


मुंबईत भारतीय नौदलाचे हेलिकॉप्टर कोसळले

अपघातात कोणतीही जीवितहानी नाही


माणिक साहा यांनी घेतली त्रिपुरा राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ

या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा होते उपस्थित


नवाब मलिकांच्या कोठडीत १४ दिवसांची वाढ


सरकारी रुग्णलायात महिलांसाठी दर बुधवारी मोफत उपचार

गिरीश महाजन यांची माहिती


केसीआर यांची मुलगी कविता यांना ईडीकडून समन्स,

दिल्ली मद्यविक्री घोटाळा प्रकरणी चौकशीसाठी बोलावले


सरकारला कदाचित नुकसानीचा अंदाज नाही – अजित पवार

राज्याताली शेतकऱ्याची परिस्थिती अत्यंत बिकट

सण साजरे करताना सरकारने बळीराजालाही उभं करावं

खचून गेलेल्या शेतकऱ्याला आधार दिला पाहिजे, त्याला उभारी देण्याकरता उपाययोजना राबवाव्यात – अजित पवार


माणिक साहा आज त्रिपुराच्या मुख्यमंत्रीपदाची घेणार शपथ

पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह होणार सहभागी


भारतीय वंशाचे अरुण सुब्रमण्यम अमेरिकेतील न्यायालयाच्या न्यायाधीशपदी

न्यू यॉर्कच्या दक्षिण जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश

या न्यायाधीशपदी विराजमान होणारे अरुण सुब्रमण्यम पहिले दक्षिण आशियातील पहिले न्यायाधीश


विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजपासून दुसरा आठवडा


 

First Published on: March 8, 2023 9:42 AM
Exit mobile version