Maharashtra Bandh: महाराष्ट्र बंदला विरोध करण्यासाठी रस्त्यावर येऊन दाखवावं; संजय राऊतांचं आव्हान

Maharashtra Bandh: महाराष्ट्र बंदला विरोध करण्यासाठी रस्त्यावर येऊन दाखवावं; संजय राऊतांचं आव्हान

राज्यात लखीमपूर खेरीमधील शेतकऱ्यांवरील अत्याचाराचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने आज बंद पुकारला होता. या बंदला सुरुवाती झाली असून महाविकास आघाडीच्या बंदला भाजप, मनसेने विरोध दर्शवला आहे. यावर शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी महाराष्ट्र बंदला विरोध करण्यासाठी रस्त्यावर येऊन दाखवावं, असं म्हटलं आहे. हा बंद आम्ही मोडून काढू ही भाषा जर कोणी वापरत असतील तर ते मूर्ख आहेत, असा खोचक टोला राऊतांनी लगावला.

शेतकऱ्यांना चिरडून मारलं. त्यामुळे देशातील संपूर्ण शेतकरी आणि शेतीवरती अवलंबून असलेला समाज हा न्यायाच्या अपेक्षेने आपल्याकडे पाहतो. महाराष्ट्र हा कृषिप्रधान आहे. न्यायप्रिय राज्य आहे. त्यामुळे महाराष्ट्राने शेतकऱ्यांच्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी बंद पुकारला आहे. बंद सुरु झालेला आहे. राज्यतला बंद १०० टक्के यशस्वी होईल.

कोणत्या बसेस फुटल्या माहित नाही. पण शेतकऱ्यांच्यासंदर्भातला लोकांचा संताप संजून घेतला पाहिजे. जर कोणी म्हणत असेल आमचा महाराष्ट्र बंदला पाठिंबा नाही. अशी राजकीय विधाने कोणी करत असेल तर त्यांनी स्वत: ला आपण या देशाचे खरे नागरिक आहोत का? या देशातील शेतकऱ्यांचे देणं लागतो का? याचा विचार केला पाहिजे.
हा बंद आम्ही मोडून काढू ही भाषा जर कोणी वापरत असतील तर ते मूर्ख आहेत. जर कोणाला वाटत असेल रस्त्यावर आम्ही येऊ, तर त्यांनी येऊन दाखवावं. जसं लखीमपूर खेरीमध्ये मंत्रिपुत्राने शेतकऱ्यांना चिरडण्याचा प्रयत्न केला थार गाडीच्या माध्यमातून, अशी कोणाकडे एखादी जीप गाडी असेल मुंबईत किंवा महाराष्ट्रात तर त्यांनी ती रस्त्यावर आणावी, असं राऊत म्हणाले.

बंद चांगला आहे, यश्स्वी आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राषअट्रवादी हे तीन्ही पक्ष पूर्ण ताकदीनं आणि सक्रीयपणे या बंदमध्ये सामील झाले झाले आहेत. खरं तर सक्रिय होण्याची गरज नाही. लोकांनी उत्सफुर्तपणे बंद पुकारला आहे. ज्या काही किरकोळ घटना घडतात त्या जगभरामध्ये बंदच्या वेळी घडतात, असं राऊत म्हणाले.


हेही वाचा – शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावा षण्मुखानंद हॉलमध्ये होणार


 

First Published on: October 11, 2021 11:05 AM
Exit mobile version