HSC Results : १२वीचा निकाल जाहीर! ९०.६६ टक्के विद्यार्थी पास, मुलींची पुन्हा बाजी!

HSC Results : १२वीचा निकाल जाहीर! ९०.६६ टक्के विद्यार्थी पास, मुलींची पुन्हा बाजी!

प्रातिनिधिक छायाचित्र

राज्य शिक्षण मंडळाचा १२वीचा निकाल अखेर जाहीर झाला आहे. नेहमीपेक्षा सुमारे दीड महिना उशिरा हे निकाल जाहीर झाले आहेत. राज्यभर १२वीच्या निकालांची आकडेवारी ९०.६६ टक्के इतकी झाली आहे. त्यामध्ये विज्ञान शाखेचा निकाल ९६.९३ टक्के, वाणिज्य शाखेचा निकाल ९१.२७ टक्के तर कला शाखेचा निकाल ८२.६३ टक्के इतका लागला आहे. याही वर्षी कोकण विभागाची १२वीच्या परीक्षांमध्ये सरशी झाली असून कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक ९५.८९ टक्के इतका लागला आहे तर औरंगाबाद विभागाचा निकाल सर्वात कमी म्हणजे ८८.१८ टक्के इतका लागला आहे. गेल्या वर्षी २८ मे ला निकाल लागला होता. मात्र, यंदा कोरोनाचं संकट आणि त्यामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर पेपर तपासणीस झालेला उशीर यामुळे निकाल आज म्हणजेच १६ जुलै रोजी लागले आहेत.

या वर्षी १४ लाख २० हजार ५७५ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी १४ लाख १३ हजार ६८३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यात १२ लाख ८१ हजार ७१२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

यंदाच्या निकालातही विद्यार्थिनींची सरशी झाल्याचं पाहायला मिळत आहे. विद्यार्थिनींचा निकाल यंदा ९३.८८ टक्के लागला असून विद्यार्थ्यांचा निकाल ८८.०४ टक्के इतका लागला आहे. याशिवाय दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल ९३.५७ टक्के इतका लागला आहे.

यंदाच्या परीक्षेचं आणखी एक विशेष म्हणजे एकूण १५४ विषयांच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या, त्यातल्या तब्बल २६ विषयांचा निकाल १०० टक्के लागला आहे.

विद्यार्थ्यांना दुपारी एक वाजेनंतर या वेबसाईटवर निकाल पाहाता येईल – http://hscresults.mkcl.org/

राज्यातील नऊ विभागीय मंडळात ७५ टक्क्यांहून अधिक गुण मिळविण विद्यार्थ्यांसी संख्या १ लाख ४३ हजार ४४१ आहे. यामध्ये मुंबईतील विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. मुंबईत तब्बल ४३ हजार ३७० विद्यार्थ्यांनी ७५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविले असल्याचे बोर्डाने जाहीर केले आहे. दरम्यान, निकालाच्या एकूण टक्केवारीत मुंबईला पुण्याने मागे टाकले असले तरी निकालाच्या गुणवत्तेत मात्र मुंबईने बाजी मारत पुण्याला मागे टाकले आहे. पुण्यात ७५ टक्क्यांहून अधिक गुण मिळविणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या ही २७ हजार ९७४ इतकी आहे.

पुणे : 92.50
नागपूर : 91.65
औरंगाबाद : 88.18
मुंबई : 89.35
कोल्हापूर : 92.42
अमरावती : 92.09
नाशिक : 88.87
लातूर : 89.79
कोकण : 95.89
एकूण : 90.66

First Published on: July 16, 2020 11:55 AM
Exit mobile version