बुलढाणा : विहिरीत आढळले एकाच कुटुंबातील ५ जणांचे मृतदेह

बुलढाणा : विहिरीत आढळले एकाच कुटुंबातील ५ जणांचे मृतदेह

बुलढाणा : विहिरीत आढळले एकाच कुटुंबातील ५ जणांचे मृतदेह

बुलढाणाच्या मेहकर तालुक्यातील माळेगावात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. माळेगावातील एका विहिरीत महिलेसह चार मुलींचा मृतदेह आढळून आल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या पाचही व्यक्ती एकाच कुटुंबातील असल्याची माहिती समोर आली आहे.

बुलढाणाच्या मेहकर तालुक्यातील माळेगावात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. माळेगावातील एका विहिरीत महिलेसह चार मुलींचा मृतदेह आढळून आल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या पाचही व्यक्ती एकाच कुटुंबातील असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, ही हत्या की आत्महत्या याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

नेमके काय घडले?

बुलढाणा जिल्ह्यातील मेहेकर तालुक्यातील माळेगाव परिसरात असलेल्या एका विहिरीत आज, सोमवारी सकाळी पाच मृतदेह तरंगत असल्याचे शेतकऱ्यांना दिसले. या घटनेनंतर संपूर्ण गावात एकच खळबळ उडाली. दरम्यान, विहिरीत आढळलेले पाच मृतदेह एका आईसह चार मुलींचे असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, ही आत्महत्या केली की, त्यांची हत्या करण्यात आली, हे अद्याप कळू शकलेले नाही. आई उज्वला ढोके (३५), मुलगी वैष्णवी ढोके (९), दुर्गा ढोके (७), आरुषी ढोके (४), पल्लवी ढोके वय (१ वर्ष) अशी मृतांची नावे आहेत. गावकऱ्यांच्या मदतीने पोलिसांनी मृतदेह बाहेर काढले असून हे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

First Published on: September 23, 2019 10:32 AM
Exit mobile version